जातीवर गेला मानव आपुल्या !

अणुस्फोटकाचा नका मानू रोष

सारा आहे दोष मानवाचा

मानव म्हणजे एक पशुवंश

मुख्य तो विध्वंस-कर्म जाणे

अणुरेणूमध्ये वसे परब्रह्म

गेला वेदधर्म विसरुनी

मर्कटाच्या हाती दिधले कोलीत

सुटले लावीत आग जगा

जातीवर गेला मानव आपुल्या व्हायचा होऊ द्या नाश आता !