चिमुकले बाळ आहे मी अल्लड !

चिमुकला तारा करी लुकलुक

तयाचे कौतुक रात्र करी

चिमुकले फूल वेलीवरी डुले

वनदेवी भुले पाहून ते

चिमुकला झरा वाहे खेळकर

नदी कडेवर त्याला घेई

चिमुकले फूलपाखरु गोजिरे

करी ते साजिरे उपवन

चिमुकले बाळ आहे मी अल्लड

देव माझे लाड पुरवीतो