क्लिनिकल फार्मासिस्ट

या आधी आपण कम्युनिटी फार्मासिस्ट व हॉस्पिटल फार्मासिस्ट बद्दल माहिती घेतली आहे.कम्युनिटी व हॉस्पिटल फार्मासिस्ट दोघांची भूमिका ही औषध वितरण,रुग्ण समुपदेशन,रुग्ण इतिहासाची नोंद ठेवणे आहे.हॉस्पिटल फार्मासिस्टची भूमिका ही थोडी व्यापक आहे जसे की हॉस्पिटलमध्ये  औषध साठा नियंत्रण करणे,परिचारिका केंद्रावरील औषधांचे नियोजन करणे.तथापि क्लिनिल फार्मासिस्टची भूमिका ही अत्यंत व्यापला स्वरूपाची आहे.क्लिनिकल फार्मासिस्टचे काम हे आरोग्य यंत्रणेनेतील डॉक्टर, परिचारिका(नर्स) यांच्याबरोबरीने चालते.केवळ औषध वितरण न करता आरोग्य यंत्रणेतील एक महत्वपूर्ण भाग आशा स्वरूपाची त्याची भूमिका दिसून येते.क्लिनिकल फार्मासिस्ट हा देखील नोंदणीकृत फार्मासिस्ट असतात तथापि त्यांची शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण हे विशेष दर्जाचे असते जेणेकरून ते आरोग्य यंत्रणेतील इतर घटकांबरोबर मिळून व्यापक स्वरूपाची आरोग्य सेवा पुरवू शकतील.