जन्याच पोर.
गावच्या जत्रेचा आज शेवटचा दिवस होता. जन्याच चार वर्षाच पोर जत्रेला जाण्यासाठी हटून बसल होत. आजूबाजूची सारी पोरं जत्रेला जाऊन आली होती ...खेळणी, भिंग्र्या, घेऊन खेळत होती, चिक्की , गूळ - दाण्याचे लाडू खात होती......जन्याकडे एक फुटकी कवडी देखील न्हवती...पोराला जत्रेला नेल तर त्याला काय घेऊन द्यायच ह्या चिंतेत पोराला रोज "उद्याचाला जावू" अस सांगून वेळ मारून नेत होता....पण आज पोर हट्टालाच पेटल होत कांही केल्या ऐकेना ....जन्याचा संयम सुटला..पोराच्या फाटकन् कानफटाखाली जाळ काढला ...आईविना पोरक पोर रडत रडत झोपी गेल ...संध्याकाळ झाली .....उपाशी झोपलेल पोर उठल…डावा गाल सुजलेला...आजीकडे भाकर तुकडा मागू लागलं……!