प्रेम
गौरी आणि निशांतच लग्न होऊन एक महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता ....ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती .....तो तिला हसवायचा ....चिडवायचा ......मस्करी करून ....काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा ...पण तीच्या पाषाण हृदयाला पाझर फुटत नव्हता .ती फक्त ...हो ...नाही ...ठीक ...असं औपचारिकच वागायची ....पण त्याची आणि त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची ....कुठेच काहीच कमी पडणार नाही .....याची काळजी घ्यायची ...येणाऱ्या जाणाऱ्याचा आदर सत्कार ....पाहुणचार .....सगळं सगळं राजिखुशीने ती करायची पण तो जवळ आला कि ......ती अगदीच औपचारिक भूमिका वठवायची ... निशांत नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला ....आणि ...गौरी तिची काम आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली ....आणि तिची आवडती गाणी लावलीत ......अखियोंके झरोखोमे मैने देखा जो सावरे .......गाणं लागताच ती ताडकन उठली आणि प्लेयर बंद केला .आणि मुसमुसत रडायला लागली ....तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेऱ्या घालू लागला ...... गौरी स्वभावानी शांत ...सुंदर ...नाकी डोळी अगदी कोरीव ...घरात थोरली .....त्यामुळे समजदार ...ऐन तारुण्यात पाउल टाकलेली गौरी ...आणखीनच लोभस दिसायला लागली .... त्या दिवशी तो कुठलीतरी पत्रिका द्यायला तिच्याकडे आला ...तो ..."माधव " त्याच नाव ....गौरीने त्याला पाणी आणले ....काय कोण जाणे पण एका भेटीत तो तिच्या मनात शिरला ....एका लग्नाच्या निमित्ताने त्याची भेटही झाली .....एव्हाना त्याला कळून चुकलं होतं ...ती त्याच्या प्रेमात पडलीय .... गौरीला स्थळ यायला सुरुवात झाली ...पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार ? ती आपल्याच मनाशी द्वंद्वव खेळत होती .उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होता ...गौरीने काहीच चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही .