बाल्हीक

 बाल्हीक या प्राचीन देशवाचक संज्ञेचा प्रथम उल्लेख अथर्ववेदात केल्याचे आढळते. त्याचे बाहिक, वाहिक, वाहलीक, टक्का-देश, मद्रदेश, आरट्ट इ. नामोल्लेखही केल्याचे दिसते.