कोल्हाटी

सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ ।

परब्रह्म भुलले अकळ । या खेळाचे गुरु जाणे मूळ ॥१॥

ब्रह्मा विष्णू शिवादी साचार । आधी होते निराकार ।

माझे कोल्हाटियाचा प्रकार ॥२॥

खेळे परात्पर ऊपरी । चैतन्याचे महाशिखरी ।

वेळु रोविला श्रीसोहंपुरी । खेळ खेळले नानापरी ॥३॥

आमुचा खेळ पाहुन । निर्गुण ते जाहले सगुण ।

शरण एका जनार्दन । गेला तनु मन विसरून ॥४॥