संगत
आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का.. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका.. किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल.