व्यायाम आणि झोप

 आपला व्यायाम आणि झोप यांकडे लक्ष द्या .चांगल्या झोपेचे महत्त्व यावर मी यापेक्षा काही बोलू शकत नाही. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचा मेंदू न्यूरॉन्स मधु ती हानिकारक तत्व काढतो जी जागृत अवस्थेत उपस्थित असतात. समस्या केवळ हीच आहे की मेंदू ही तत्व तेव्हाच काढू शकतो जेव्हा तुम्ही झोपता. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर ही हानिकारक तत्व तुमच्या मेंदूत उपस्थित राहतील आणि तुमचे कार्य शिथिल करतील. या नुकसानाची भरपाई तुम्ही जागरणासाठी चहा कॉफी पिऊन देखील करू शकत नाही म्हणूनच भरपूर काम केल्यानंतर आपले शरीर आणि मेंदू यांना पूर्ण आराम द्या.