उठ बाई उठ ...

उठ बाई उठ लवकर उठ

घाच बाई घास दात घास

कर बाई कर आंघोळ कर

बस बाई बाई देवाकडे बस

कर बाई कर नमस्कार कर

वाच बाई वाच पुस्तक वाच

खा बाई खा भाजी पोळी खा

चाट बाई चाट लोणचं चाट

जा बाई जा शाळेला जा

कर बाई कर अभ्यास कर

म्हण बाई म्हण प्रार्थना म्हण

बघ बाई बघ फळ्यावर बघ

लिव बाई लिव गमभन लिव

म्हण बाई म्हण पाढे म्हण

सुट बाई सुट शाळा सुट

चल बाई चल घरला चल

कर बाई कर आदराने कर

आईला देवाला नमस्कार कर

-  दिलीप खापरे