दिवाळी आली दिवाळी...

दिवाळी आली दिवाळी आली

सुट्टी पडली सुट्टी पडली

आली आली फटाक्याची गाडी

आली आली फराळाची गाडी

त्या तर गाडीत फटाके सगळे

खोड्या नको सगळ्यांना मिळे

फराळाच्या गाडीत शंकरपाळे

लाडू करंज्या खातील सगळे

फुलबाजी लवंगी सगळ्यांसाठ

मोठे फटाके तर मोठ्यांसाठी

दिवाळीला घालू कपडे छान

दारात आकाशकंदिलाची शान

अशी दिवाळी रोज रोज यावी

सर्वानी रोज रोज मजा करावी

-  दिलीप खापरे