चांदोमामा चांदोमामा ...

चांदोमामा चांदोमामा

भागलास का?

लिंबोनीच्या झाडाखाली

लपलास का?

लिंबोनीचं झाड करवंदी

मामाचा वाडा चिरबंदी

मामाच्या वाड्यात येऊन जा

तुपरोटी खाऊन जा

तुपात पडली माशी

चांदोमामा राहिला उपाशी