सूर्य
सूर्य पिता, आत्मा, समाजात मान, सन्मान, यश, कीर्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांचा कारक असतो. याची राशी सिंह आहे. पत्रिकेत सूर्य अशुभ असेल तर पोट, डोळे, हृदयाचे आजार होऊ शकतात तसेच सरकारी कामात बाधा उत्पन्न होऊ शकते. याची लक्षणे ही आहेत की तोंडात वारंवार बेडका जमा होतो, सामाजिक नुकसान, अपयश, मन सतत दुःखी आणि असंतुष्ट असणे, पित्याशी वाद किंवा वैचारिक मतभेद, सूर्याच्या पीडेची लक्षणे आहेत.