लेख: निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

(हा लेख २०१४ साली लिहिलेला आहे. ब्लॉगवर नंतर  टाकला आहे)

निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.