श्रावणाची गोष्ट

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ गेला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि नेहमीप्रमाणे मौन होऊन स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला बेताळ त्याला म्हणाला— "राजा, या भयंकर स्मशानात अशा रात्रीच्या वेळी तू एवढे परिश्रम करीत आहेस. परंतु तुझी ही मेहनत फुकट नाही असे मात्र नाही. असं कधी झालं तर तू रागवण्यात अर्थ नाही. सर्व आपल्याच कृतीचे फळ आहे अशी मनाशी समजूत करून घ्यावी लागते. त्याचे उदाहरण म्हणून मी तुला श्रावणाची गोष्ट सांगतो. लक्ष देऊन ऐक." असे सांगून बेताळ गोष्ट सांगू लागला.

कांभोज नावाच्या देशाचा चंद्रपाल नावाचा राजा फार दयाळू होता. कोणी त्याच्याकडे मदत मागायला आला तर त्याच्या तोंडून कधी नकार मिळत नसे. तो त्याला शक्य होईल तेवढे धन सहाय्य करीत असे. त्याच्या दरबारात अनेक कवी व पंडित होते. दररोज संध्याकाळी आपल्या कविता म्हणून दाखवीत.

एक दिवशी श्रावण नावाचा एक कवी राजाश्रय मिळावा, या आशने आला आणि चंद्रपालच्या कीर्तीचे गायन त्याने एक नवी कविता रचून केले. ती कविता ऐकून राजा खूप झाला व त्याने श्रावणला आपल्या दरबारात चांगला पगार देऊन नोकरीवर ठेवून घेतले.

दुसऱ्या दिवसापासून श्रावण दरबारात येऊ लागला. संध्याकाळी कवी आपापल्या कविता म्हणून दाखवू लागले. पंडितांचा शास्त्रार्थ चालू असतां राजा चंद्रपाल कविता व शास्त्रार्थ लक्ष देऊन ऐकत होता. परंतु श्रावणला त्याच्या बरोवरचे कवी व पंडित कविता म्हणत किंवा शास्त्रार्थ करीत त्यात काही निरर्थक गोष्टी, शब्द दोष व काव्यदोष आढळू लागले. आपण सुरुवातीलाच त्यांचे खंडन करणे रास्त होणार नाही, असे समजून ते सर्व सहन केले. परंतु हळूहळू त्याला ते असह्य वाटू लागले.

परंतु राजा चंद्रपाल त्यांचा दोषपूर्ण शास्त्रार्थ आणि कविता ऐकून खूप होई हे पाहून श्रावणला आश्चर्य वाटले. परंतु त्याला एका गोष्टीची शंकाही वाटत होती. कदाचित अशा पंडितांना व कवींना काढून टाकलं तर ते निराश्रित होतील म्हणून तर राजा त्यांना काढीत नसेल?

त्याने चोकशी करून पाहिली तेव्हां त्याला असे आढळून आले की एका दोघांना सोडून बाकी सर्व जण चांगल्या स्थितीत होते. तेव्हा श्रावणला राजाच्या काव्य रसिकते विषयी आणि त्याच्या स्वतःच्या काव्यकले विषयी शंका वाटू लागली. चंद्रपाल फक्त ऐकतच असे, स्वतः त्याने कधी आपली कविता म्हणून दाखविली नाही. शास्त्रार्थ ऐकून तो फक्त खूप होई, स्वतः कधी त्याने शास्त्रार्थात भाग घेतला नाही.

पुढे एकदा शंकरानंद नावाचा एक श्रेष्ठ पंडित काशीहून कोशलच्या वाटेवर कांभोज नगरी आला. तो गावात एकच दिवस राहायला थांबला. श्रावणने त्याला भेटून आपली कविता म्हणून दाखविली व विनंती केली— "मी काव्यकलेत आणखी उन्नती करावी व काही शिकायला मिळावे, या हेतूने मी आपणांकडे आलो आहे. प्रस्तुत मी राजाच्या आश्रयाला दरबारात आहे. माझ्या काव्यकले विषयी आपले विचार आपण मला सांगावे."

शंकरानंद स्मित करून म्हणाले— "तुला राजाश्रय मिळाला आहे ना? तो कवी म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून. बावरें, तू स्वतःला कवी म्हणविण्या-साठी पुष्कळ मेहनत करण्याची गरज आहे."

श्रावणने शंकरानंदांचे आभार मानले आणि परत येणार चंद्रपालचे प्रधान विशाल यांना भेटायला गेला व म्हणाला— "प्रधान, मला कवी म्हणविण्यापुरते अल्प ज्ञान आहे. तरी त्याची स्तुती करून महाराजांनी आपल्या दरबारात मला आश्रय दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. मी आणखी विद्याभ्यास करण्यासाठी काशीला जात आहे. मला आपण निरोप व आशीर्वाद द्यावा ही विनंती करायला आलो आहे."

राजाची प्रशंसा करून म्हटली. त्यावर खूप होऊन राजाने त्याला दरबारात आश्रय दिला. अशी संधी मिळाली असतां ती हातातून जाऊ देणे हा अविवेकच नव्हे का? हे संकट त्याने स्वतः होऊन आपल्यावर ओढून घेतले. सभेतील कोणत्याही कवीची अगर पंडिताची निंदा करण्यात काही अर्थ नाही. त्यांची जेवढी योग्यता व विद्वत्ता आहे तिच्यावर अवलंबून राहून आनंदाने आयुष्य घालवीत आहे. आणखी एक गोष्ट, श्रावणने स्वतःला कवी म्हणून घेण्यासाठी पुष्कळ अध्ययन व श्रम करणे आवश्यक असल्याचे शंकरानंदांनी त्याला सांगितले. अशा व्यक्तीला प्रधानाने तू हुशार आहेस अशी स्तुती केली. त्यात प्रधानाचा हेतू काय होता? ह्या शंकाचे समाधान कारक उत्तर माहीत असूनही तू दिले नाहीस तर त्याचा परिणाम तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांवर लोळू लागतील."

त्याचे उत्तर देत विक्रमादित्य म्हणाला— "श्रावण हुशार आहे, असे म्हटले तर त्यांत शंकाच नव्हती. त्याच्या सारख्या कवीला राजाश्रय मिळाला या बद्दल शंकरानंदांना आश्चर्यच वाटले होते. त्याला तो कवी म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून त्याने काव्य कलेत पुष्कळ मेहनत करण्याची गरज आहे, असे सांगितले. श्रावणला ज्ञानाची भूक होती. स्वतःची उन्नती करून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीचे गुणदोष सांगणाऱ्या व्यक्तीची गरज असते. असे लोक चंद्रपालच्या दरबारात नव्हते. श्रावणला तशी व्यक्ती तेथे मिळाली नाही. श्रावणची एक सामान्यशी कविता ऐकून चंद्रपाल खूप झाला होता. अशा राजाच्या दरबारात राहून श्रावणला खरा कवी कधीच होण्याची शक्यता दिसली नाही. म्हणून तो आणखी कोठेतरी जाण्याचा विचार करू लागला होता.

राजा चंद्रपाल फारसा हुशार किंवा विवेकी असेल असे श्रावणला दिसले नाही. अशा राजाचे राज्य सुरळीत आणि व्यवस्थित चालत होते त्याला कारण, आड राहून सर्व चक्रे फिरविण्याचे काम प्रधान करीत होता हे. म्हणूनच श्रावण प्रधानाला भेटून त्यांचा निरोप घ्यायला गेला होता. त्याला ह्या गोष्टीची चांगली कल्पना झाली तेव्हा ही सर्व ग्रहण करणारी व्यक्ती हुशार असल्याचे प्रधानाने सांगितले तर त्यांत चूक नव्हती.

"तुला आश्रय देणाऱ्या महाराजां कडून निरोप घेण्या व्यतिरिक्त मेरेकडून निरोप घेण्याची गरज नाही." प्रधानाने हे म्हटले त्यात त्याला सावध करण्या शिवाय एक सूचना सुद्धा आहे. म्हणजे राजा चंद्रपालचे अज्ञान श्रावणने जगजाहीर करू नये ही. श्रावण सूक्ष्मग्राही सुद्धा असल्या कारणाने त्याने प्रधानाला हे म्हटलं की राजाचा निरोप घेतल्या शिवाय त्यांची कृपा व प्रेम विसरून जाण्या इतका मी कृतघ्न नाही."

"राजा चंद्रपाल तितकासा हुशार नसेल. परंतु चांगला उदार पुरुष होता. ती गोष्ट श्रावणला व प्रधानाला माहीत होती. राजा विषयी त्यांच्या मनात असलेले आदर व्यक्त करतो. त्यावरून ते किती गुणवान आहेत हे ही कळून येते."

अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होतांच बेताळ प्रेतासह अदृश्य झाला आणि पुन्हां झाडाला जाऊन लोंबकूं लागला.