Bookstruck

प्रकरण ९

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सकाळी सहा वाजेपर्यंत सांझी तिथेच होती.

ही आपल्याला गुंडाळायचा प्रयत्न करत असेल तर ते आपण होऊन द्यायचं नाही. वज्रने मनाशी निश्चय केला. सकाळी सात- सव्वा सात वाजता वज्र उठला. आपले प्रातर्विधी आटोपून तो किचन कडे जायला निघाला. आज शिरताच त्याला आम्लेटचा खमंग वास आला. कालच्या प्रसंगा नंतर सांझी नेमकी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज वज्र करू लागला. त्याची अपेक्षा होती की नेहमीप्रमाणे ती काहीच न बोलता कामाला लागेल. पण तसं झालं नाही. तिने त्याच्या कडे बघितलं आणि चक्क स्मित केलं.

"गुड मॉर्निंग शीर्ष" ती मधुर आवाजात म्हणाली.

"गुड मॉर्निंग सांज" वज्रने सुद्धा प्रतिसाद दिला.

"तुला आम्लेट आवडतं ना? मी बनवलंय तुझ्यासाठी बस तिथे" तिने खुर्ची कडे निर्देश करत सांगितलं.

वज्रने चूपचाप जेवायला सुरुवात केली. त्याला माहित होतं की सांज कडून हे अचानक आलेलं प्रेम नक्कीच काहीतरी नवीन कारस्थानाचं निदर्शक आहे.

"तुला पलाशबद्दल काय वाटतं?" तिने अचानक विचारलं.

"तो एक चांगला माणूस आहे मेहनती आहे" वज्र म्हणाला.

"तुला असं वाटतं? पण मला वाटतं तो काहीतरी लपवतोय आणि विठ्ठलला त्याबद्दल माहिती आहे म्हणून तो त्याला त्रास देतोय" सांझीने आपला मुद्दा मांडला.

वज्रला कळलं की ती आता पलाशच्या विरोधात वज्रला भडकवण्याचा प्रयत्न करतेय. तिने पलाशच्या त्या जुन्या रहस्याबद्दल वज्रला सांगून त्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्लॅन केला होता. पण वज्रने स्वतःला सावरून धरलं.

"जे असेल ते समोर येईलच सांज पण सध्या आपण आपल्या कामावर लक्ष देऊ" वज्र एवढं बोलून तिथून उठला.

दिवसभर सांज त्याच्यावर लक्ष ठेवून होती. वज्र गाडी दुरुस्तीच्या कामात व्यग्र होता तेव्हा तिने मुद्दाम त्याच्या जवळ येऊन काहीतरी मदत हवी का असं विचारण्याचा प्रयत्न केला. पण वज्रने प्रत्येक वेळी तिला टाळलं. रात्री उशिरा पलाश परतला तेव्हा सांज आणि वज्र मध्ये नक्की काय घडतंय हे त्याला समजलं होतं पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. रात्रीच्या अंधारात सांझी कोणत्या तरी नवीन प्लॅनची वाट पाहत होती.

« PreviousChapter ListNext »