प्रकरण ८
ड्रायव्हरने शिट्टी का मारली म्हणून वज्रने तिच्याकडे पाहिलं.तिने एक टंच दिसेल असा टी शर्ट आणि हाफ पँट घातली होती.
“ काय चाललंय हे?” वज्रने तिला विचारलं.
“ तू नोकर आहेस इथे.तू कोण मला विचारणार?” सांझी म्हणाली.
“ आता आपल्या दोघांत काय नातं आहे हे महत्वाचं नाही.आपण दोघेही एकाच संकटात सापडलोय.तुझ्याकडे बघून त्याने शिट्टी वाजवली तू ऐकलीस ना? पुढची व्यवस्था लागे पर्यंत आपण दोघंच इथे राहू शकतो पण जर तुला पळायचं असेल तर हा रस्ता सोपा नाहीये सांज.” वज्रने तिला सावध केलं.
सांज जंगलाच्या एका गुहेत लपून बसली होती आणि वज्रने तिला तिथून बाहेर काढलं होतं. तिच्या हातातून रिव्हॉल्व्हर कधीच पडलं होतं.
“मला माफ करा वज्र, मी पैशाच्या लोभापायी हे सगळं केलं पण आता मला पळायला जागा नाहीये.” ती रडत म्हणाली.
वज्रने तिला आपल्या जवळ घेतलं आणि शांत केलं.बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि गडगडाटात सांजचे रडणे दबून जात होते.
“आपल्याला इथून निघावं लागेल पोलीस कोणत्याही क्षणी इथे पोहोचू शकतात.” वज्र म्हणाला.
दोघेही अंधारात आणि पावसात जंगलातून वाट काढत होते.सांज खूप थकली होती आणि तिचे पाय आता चालत नव्हते.वज्रने तिला पाठीवर घेतलं आणि पुढे सरकला.
“तू का करतोयस हे माझ्यासाठी? मी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता.” सांजने विचारलं.
“प्रत्येक माणसाला दुसरी संधी मिळायला हवी आणि मला माहिती आहे की तू मनातून वाईट नाहीस फक्त परिस्थितीने तुला तसं बनवलंय.” वज्र शांतपणे म्हणाला.
पुढच्या काही तासात ते हायवे पर्यंत पोहोचले आणि एका ट्रकच्या सहाय्याने त्यांनी पळ काढला. वज्रला आता कलकत्त्याला पोहोचायचं होतं जिथे त्याचा मित्र 'अथांग' त्याची वाट पाहत होता.