Bookstruck

प्रकरण ४

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोलाघाट ला आल्या नंतर बंगली भाषेतली एक भली मोठी पाटी वज्रला पाहायला मिळाली.त्याचा अर्थ काय म्हणून वज्रने विचारलं, पलाश ने त्याचा अर्थ सांगितला, त्या नुसार जरा विसावा असं त्या धाब्याचं नाव होतं.हा शेवटचा धाबा आहे, इथे तुमच्या आणि वाहनाच्या खाण्या पिण्याची सोय आहे.पुढे दीडशे किमी पंप किंवा हॉटेल नाही.असा मजकूर होता.

एका बाजूला वळण घेऊन घाट रस्ता जात होता आणि उजव्या बाजूला दरीच्या काठाला खूप मोठा प्लॉट होता त्यावर पंप, सर्व्हिस स्टेशन, एक बऱ्यापैकी मोठं आतिशय स्वच्छ रेस्टॉरंट, त्यामागे बंगला, आउट हाउस, आणि त्या सगळ्याच्या मागे असलेल्या खूप मोकळ्या जागेत भंगार माल ठेवायची जागा.

पलाश ने ट्रक थांबवला आणि गेट उघडण्यासाठी हॉर्न वाजवला.पण कोणीच आलं नाही. पण तो चिडला नाही, किंवा त्याला त्याच आश्चर्य वाटलं नाही.तो उडी मारून ट्रक वरून खाली उतरला, गेट उघडलं आणि पुन्हा वर चढून ट्रक चालू केला आणि गेट मधून आत आणला. हे त्यानं एवढ्या पटकन केलं की वज्रने खाली उतरून गेट उघडायची तयारी करायच्या आधीच पलाश गेट उघडून पुन्हा ट्रक चालू केला होता.

गेट मधून आत आल्यावर दोघेही खाली उतरले.

“ भूक लागली असेल तुला.पण आधी फ्रेश हो. अंघोळ करून घे. तुला दाढी करायची असेल तरी कर तिथे रेझर्स, शेव्हिंग क्रीम, सर्व ठेवलंय.” बाथरुम ककडे निर्देश करून पलाश म्हणाला.

“ ठीक आहे, आवरून झाल्यावर कुठे येऊ मी?”वज्र ने विचारलं. पलाश ने त्याला रेस्टॉरंट मधला जेवणाचा हॉल दाखवला.

वज्रने जरा फुरसतीने आवरून घेतले.तुरुंगात टाकल्यापासून एवढी सोय आणि निवांतपणा मिळाला नव्हता. काय नशीब होतं आपलं! हा देवा सारखा भेटला.इथे दडून राहण्यासाठी उत्तम सोय होती. कुणाला कल्पना सुद्धा येणार नाही की पाळलेला कैदी इथे असेल.

तुरुंगात जाण्यापूर्वी वज्र दाढीमिशा ठेवत नसे.त्यामुळे गुन्हेगार म्हणून त्याचे फोटो काढले गेले होतं ते बिन दाढी मिशीचे होतं.अत्ता बाथरुम मधे दाढी करताना वज्रने मुद्दाम मिशा ठेवल्या.आणि हनुवटी खाली थोडी दाढी ठेवली.त्यामुळे त्याच्या चेहेऱ्यात बराच फरक पडला.पोलिसांनी वज्रचे फोटो पेपरात छापले असते तर ते बिन दाढी-मिशातले आले असते.त्यामुळे त्याला कोणी ओळखू शकले नसतं.

बाहर आल्यावर तो हॉटेलातल्या जेवणाच्या हॉल मधे आला. आपण आल्याचं पलाशला कळवावं म्हणून तो हक मारणार तेवढ्यात त्याला पलाश चा त्याच्या बायकोशी चाललेला मोठ्या आवाजातला संवाद ऐकू आला. पलाश तिला समजावून सांगत होता की आपल्या मदतीला मला माणूस मिळालाय आणि तो इथे जरा तयार झाला, शिकला की आपण रात्री एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा कुठेतरी ट्रिप ला वगैरे जायचं ठरवू. तुला सगळाच बघावं लागत इथलं त्यामुळे खूप दमतेस तू आता जरा तुला आराम मिळेल वगैरे. पण त्याच्या बायको कडून आलेला प्रतिसाद पाहता तिला, आपल्या नवऱ्याने एकदम आगापिछा माहित नसलेला माणूस इथे आणून ठेवणे, त्याल सगळं शिकवणं, वगैरे पसंत नव्हतं असं दिसलं. हा माणूस फुकटात काम करणार आहे का? तो इथे फुकट राहणार, पगार घेणार, नकोच हे सगळं. असं ती जोरात सांगत होती.थोड्या वेळाने दोघांचे आवाज वाढले आणि पलाश चिडून अचानक बाहेर आला. वज्र तिथे असेल त्याची कल्पना त्याला नव्हती. त्याच्या समोर बायकोने काही बोलू नये म्हणून तिला ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला,

“ अरे आलास तू? छान आवरलं आहेस. तुझ्यासाठी काहीतरी खायची सोय करून येतो.” पलाश म्हणाला आणि आत जायला निघाला तेवढ्यात एक धुळीने माखलेली गाडी आत आली आणि त्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला.

“ मी बघतो काय हवंय त्याला ते.” वज्र म्हणाला.

“ नको तू आधी खाऊन घे.मी बघतो कारवाल्याकडे. धुवायची असेल ” पलाश म्हणाला and तिकडे गेला.

वज्रला त्याच्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला.त्याने मागे वळून पाहिलं.एक तिशीच्या घरातली सुंदर स्त्री उभी होती.नक्कीच पलाशची बायको असणार. वज्रच्या मनात आलं. बरीच आधुनिक दिसत होती.जीन पँट आणि आखूड कुर्ता असा पेहेराव केला होता.वज्रला जाणीव झाली त्यापेक्षा बराच वेळ आधी ती त्याच्या मागे येऊन उभी होती.वज्रने तिच्याकडे पाहून स्मित केलं पण ती हसली नाही.बघत राहिली.

‘खडूस’ वज्रच्या मनात आलं.पण तिच्या मधे पुरुषांना आकर्षित करणारं काहीतरी होतं.वज्रसुद्धा तिच्याकडे बघत राहिला.पलाश आपलं काम संपवून आला. त्याने वज्रची आपल्या बायकोशी ओळख करीन दिली.

“ ही सांझी.” तो म्हणाला. “ आणि सांझी, मी मगाशी ज्याच्या बद्दल सांगत होतो तो हा. शीर्ष सहानी. याच्यासाठी काहीतरी खायला आण.”

ती नाईलाजाने आत गेली. एकंदरीतच वज्रचं येणं तिला पसंत नव्हतं.

तिने जेवण मात्र फार म्हणजे फारच अप्रतीम बनवलं होतं. वज्र आणि पलाश घोष एकत्र जेवत असताना वज्रने त्याला विचारलं की इथे नेमकं काय काम त्याने करायचं आहे.

“ तू इथे पंप आणि सर्व्हिसिंग या गोष्टी पहायच्या, सांझी हॉटेलचं बघेल. बाहेरचा सगळा परिसर स्वच्छ ठेवायचा, गरज पडेल तेव्हा रात्रपाळी पण करायची. तू सतत गुंतलेला राहशील कामात पण मला मदत हव्ये ती हीच आहे. अत्ता सगळ मीच करतोय आता दोघांनी मिळून करू.”

वज्रला तेच बर वाटलं कारण तो जेवढा बिन कामाचा रहिला असता तेवढ त्याच लक्ष सांझीकडे जात राहिलं असतं.जेवण झाल्यावर त्याने वज्रला पंपाच काम कसं चालत, गाड्या धुताना काय काळजी घ्यायची, दुरुस्ती करताना काय बघावं लागतं याचे धडे द्यायला सुरुवात केली.आम्ही दोघांनी मिळून खरगपूर वरून आणलेला भंगाराचा ट्रक मागच्या मोकळ्या जागेत रिकामा केला.

“ सांझीचं टेन्शन घेऊ नको.तिला विरोध केलंला आवडत नाही.बाहेरच्या कुणाला इथे कामाला आणलेलं तिला आवडत नाही.पण काळजी नको करू.तिचा विरोध दोन तीन दिवसात मावळेल.मी समजावीन तिला.”

पलाश अधून मधून येणाऱ्या गाड्यात पेट्रोल किंवा डीझेल भरणे, हवा भरणे अशी काम करत होता.पन्नाशीच्या घरात त्याचा उत्साह आणि ताकद कौतुकास्पद होती. हातातली काम संपल्यावर त्याने वज्रला सिगारेट दिली.

“ तिची माझी भेट कशी झाली तुला सांगतो,” एक दिवस मूड मधे असताना धुराचे वलय हवेत सोडत पलाश सांगायला लागला.

“ दोन वर्षांपूर्वी एक मोठी बस माझ्या या धाब्यावर आली. गाडीत डीझेल भरायला आणि आतल्या प्रवाशांना जेवायचं होतं म्हणून. माझ्या बायकोचं पंधरा दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. माझ्या मदतीला कोणी नव्हतं. एवढे प्रवासी एकदम आल्यामुळे वज्रची पळापळ झाली.पंपाच बघू की जेवणाचं असं होऊन गेलं.सगळे प्रवासी हॉटेलात येऊन बसले आणि वेगवेगळ्या ऑर्डर्स द्यायला लागले. थोड्या वेळाने लक्ष गेलं गेलं तर सांझी बाहेर टेबलावर जेवायला बसायच्या ऐवाजी भटारखान्यात माझ्या मदतीला लागली होती स्वत:हून. मला मदतीची नितांत गरज होती.मी तिचे आभार मानले आणि तिला कुठे काय ठेवलंय ते सांगत होतो.तिने फार छान हाताळल सगळं. सगळे जेवल्यावर बस जायला निघाला तेव्हा ती परत गेली नाही.तिने आपलं सामान खाली उतरवलं. तिच्या मनात इथेच राहायचं असावं. मी तिला सांगितलं जर तिला इथे नोकरी हवी असेल तर मी तयार आहे. तू ज्या प्रमाणे मी विचारल्यावर लगेच हो म्हणालास, नोकरीला, तसं ती ही तेव्हा तय्यार झाली होती. खरी अडचण पुढे थी. मी चौकशी केली. ती नेपाळी स्त्री होती. ट्रिप साठी भारतात आली होती.तिकडे तिचं कोणीच नव्हतं असं म्हणाली.

तिला इथे नोकरीला ठेवायचं तर एक स्त्री एका पुरुषाबरोबर राहते हे समाजात योग्य दिसलं नसतं, ती दिसायला चांगली होती, कामसू होती, मला मदतीची गरज होती, काही दिवसांनी मी तिला थेट लग्नाचं विचारलं. ती माझ्यापेक्षा वीस वर्षांनी लहान होती.प्रेमापेक्षा दोघांनाही गरज आणि तडजोड म्हणून दोघे तयार झालो.ती थोडी अहंकारी आहे.आमच्या दोघांत तिला बाहेरचा कोणी नको असतो.कितीही कष्ट पडले तरी चालतील असं तिचं म्हणणं असतं.”

एक गाडी धुराळा उडवत आत आली आणि वज्र आणि पलाशच्या गप्पा थांबल्या. वज्र चटकन पुढे गेला, गाडीत पेट्रोल भरलं. वायपर खालची काच साफ केली, हवा भरली. त्याने हाताळलेलं हे पाहिलं गिऱ्हाईक होतं.आणि पलाश त्याच्याकडे कौतुकाने बघत होता.

“ तुम्हाला दहा पंधरा मिनिटात आमच्या रेस्टॉरंट मधे गरमागरम टिकिया, बिर्याणी किंवा सामोसा टेस्ट करायचा आहे का? तुमचं खाणं होई पर्यंत मी तुमची पूर्ण गाडी धुउन ठेवतो.” वज्र आपले सेल्समनचे कौशल्य दाखवत म्हणाला.

तो गाडीवाला हो म्हणाला. पलाशला त्याचं पुन्हा कौतुक वाटलं.

“ साहेब तुम्ही आत जाऊन फक्त यांच्या खाण्याचं बघा. मी गाडीचं बघतो.” वज्र म्हणाला.

या नंतर येणाऱ्या जवळ जवळ सगळ्याच गाडी चालकांना वज्रने जेवायला पटवले.जे फक्त जेवायला आले होतं त्यांना गाडीत पेट्रोल भरायला, गाडी धुऊन घ्यायला आग्रह केला. शेवटी एकदा पलाश त्याला म्हणाला की,

“आता बास.अन्न संपत आलंय कुणाला जेवायला थांबवू नको.रोज मला इथे चार ते पाच ग्राहक जेवायला मिळतात पण आज तुझ्या सेल्समनशिप मुळे ही संख्या पंधरा झाली.”

“उद्या मी बाहेर जाऊन वाण सामान घेऊन येतो.” वज्र म्हणाला.

“ तू नको मी आणि सांझी जाऊ. तू इथलं सांभाळ.” पलाश म्हणाला.

“ मला आणखी एक पैसे मिळवायचा उपाय सुचलाय.” वज्र म्हणाला.

“ काय?”

“ इथे जे ट्रकवाले येतात त्यांना आपण इथे त्यांच्या आंघोळीची सोय करून देऊ. त्याचे वेगळे पैसे घेऊ. आपल्या इथे नाहीतरी दोन तीन बाथरुम आहेतच ती पडूनच आहेत.”

“ मस्त आयडिया !” पलाश उद्गारला. या पोराला इथे आणून आपण चांगलंच केलं. त्याच्या मनात आलं.

“ जेवायला थांबतील त्यांचे कार वॉशिंग फुकट करून देऊ अशी ऑफर त्यांना देऊ.” वज्र ने सुचवलं.

“ अरे आपलं कार वॉशिंग चं उत्पन्न बुडेल अशाने.”

“ नाही.आपण त्याचं बिल रेस्टॉरंट च्या बिलात वाढवायचं.”

“ कठीणच आहेस तू.” पलाश म्हणाला. “ बर, आता खूप उशीर झालाय.आता झोप.आणखी कोणी येईल असं वाटत नाही. आलंच तर मी बघेन.तू उद्या सकाळी आठ वाजता हजर हो. ”

वज्र दमला होताच त्याची झोपायची सोय पलाशच्या बंगल्याला हायवे च्या दिशेने लागून असलेल्या आउट हाउसमध्ये केली होती. त्यापासून पन्नास साथ फूट अंतरावर बंगल्यातील सांझीची बेडरूम वज्रला दिसत होती.तिच्या खोलीत दिवे लावले होतं, आतून तिची आकृती त्याला दिसत होती.तो बराच वेळ जागाच होता.तिच्या खोलीतील दिवे मालवले गेल्यावर तो आडवा झाला. झोप लागायच्या नेमक्या क्षणाला एक ट्रक हॉर्न देऊन आत आला आणि वज्रने पाहिलं तर पलाश त्याला काय हवं नको बघायला बाहेर आला होता.

थोडक्यात पलाश ची रात्रपाळी आणि आणि वज्रची दिवसपाळी आपोआपच सुरु झाली होती. पाहता पाहता वज्र ला तिथे येऊन तीन दिवस झाले होतं.

« PreviousChapter ListNext »