प्रकरण १२
“मी खरेदीसाठी हल्दियाला जाणारे तुमच्या दोघांपैकी कोणी माझ्या बरोबर येणारे?” दुसऱ्या दिवशी सकाळी सांझीने जाहीर केलं आणि कपडे बदलायला आत गेली.वज्र ची वाट न बघता अथांग ने तिला तो येणार असल्याचं सांगून टाकलं. तो इथे राहायला आल्यापासून बाहेरच पडला नव्हता, त्यामुळे त्याला कंटाळा आला होता, शिवाय त्याला बारीक सारिक खरेदीही करायची होती.सांझीने आत जाता जाता त्यावर असा काही चेहेरा केला की तिला वज्र पेक्षा अथांग बरोबर जाण्यातच रस होता.वज्रने अथांगला तिच्या बद्दल सावध केलं. तुम्ही दोन तीन तास बरोबर असणार आहात, ती तुला गुंडाळू शकतं म्हणून स्पष्ट सांगितलं पण अथांग ने त्याला खात्री दिली की तीच नाही तर कुठलीच बाई त्याला मोहात पडू शकणार नाही.
ते दोघे तिच्या गाडीने बाहेर पडले आणि वज्र पुन्हा एकटा उरला.पंपावर वाहने येत नव्हती त्यामुळे एकाकीपणा जाणवत होता.त्याला खरं तर पळून जायला संधी होती पण पैसे नव्हते आणि तिजोरीतल्या पैशाला हात लावायचा हे त्याला पटत नव्हतं.शिवाय बाहेर नेमके कुठे जायचे, ते सुरक्षित आहे का याचा विचार त्याने केला नव्हता.
एक ट्रक पंपावर आला.
"तू इथे नवीन दिसतोस, नाही का?" त्याने वज्रकडे कुतूहलाने पाहत विचारलं. "पलाश घोष कुठे आहे?" तो जुना, नेहेमी येणारा आणि पलाशचा मित्र वाटत होता.
“साहेब एका डील साठी बाहेर गेलेत. नवीन पंपाच्या” वज्र म्हणाला.
"तो या आधी कधीही इथून बाहेर गेल्याचे मला आठवत नाही," तो म्हणाला. "मी गेल्या वीस वर्षांपासून अधूनमधून इथून जात असतो, आणि तो नेहमी मला इथेच भेटला आहे. याचा अर्थ तो परत येणार नाही का?" ट्रक ड्रायव्हर ने विचारलं
“ हिशोब पूर्ण करण्यासाठी परत येतील.."
"त्याने आपल्या पत्नीला सोबत नेलंय का?"—ट्रकवाला.
"तो बाहेर असताना तीच हे ठिकाण सांभाळत आहे. मी फक्त मदत करत आहे."
"तू तिचा मित्र आहेस का?" त्याने विचारलं.
"मला फक्त मदतीसाठी कामावर ठेवले आहे. नोकर म्हणून. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे?" वज्रने विचारलं
"ती चांगली बाई नाही. जेव्हा मी तिला इथे घोषशी लग्न केलंल पाहिलं, तेव्हा मी हादरून गेलो.." तो ट्रकच्या बाजूला टेकून उभा राहिला आणि सिगारेट ओढू लागला.
"मी तिला ती इथे येण्यापूर्वीपासून ओळखत होतो. ती पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा तिचे लग्न फणींद्र फड नावाच्या माणसाशी झालं होतं. तो एक स्नॅक बार चालवायचा. ती त्याला मदत करत असे. ते मालक नव्हते: तो फक्त भाड्याने घेऊन चालवत असे. त्याला काय झालं हे तुला माहीत्ये?"
वज्र तणावा खाली, एकही शब्द न चुकता ऐकत होता.
“ एके दिवशी सकाळी तो स्नॅक बारमध्ये मृतावस्थेत आढळला तिची कहाणी अशी होती की, ती वरच्या मजल्यावर असताना तिने गोळीबाराचा आवाज ऐकला. ती खाली आली आणि तिला तो मृत अवस्थेत आढळला. कॅश काउंटरवर त्यांना दोन हजार रुपया पेक्षा जास्त रक्कम गायब असल्याचे आढळले. असं दिसत होतं की, फड अनेक महिन्यांपासून कॅश काउंटरमधून पैसे चोरत होता. ते पैसे कधीच सापडले नाहीत. पोलिसांना वाटलं की पैसे तिच्याकडे आहेत, पण ते सिद्ध करू शकले नाहीत. एक पोलीस तर असाही होता ज्याला वाटलं की तिनेच फडला गोळी मारली होती. त्यांचे अनेक महिन्यांपासून भांडण सुरू होतं, पण तेही सिद्ध झालं नाही. त्यानंतर लवकरच ती शहर सोडून गेली. घोषसारख्या चांगल्या माणसाशी लग्न करून तिला इथे पाहून मला किती आश्चर्य वाटलं असेल याची कल्पना करा.”
"मी हे पहिल्यांदाच ऐकतोय,"वज्र म्हणाला..
"ही अशी गोष्ट नाही जी ती जाहीर करेल," तो ट्रकचालक म्हणाला. "घोष खरंच ठीक आहे ना? "
"तो ठीक आहे,मला परवाच समजलंय की तो या नवीन पेट्रोल पंपाबद्दल खूप खूश आहे. कदाचित पुढच्या वेळी तुम्ही इकडून जाल तेव्हा तुमच्या त्याची भेट होईल." वज्र म्हणाला.
त्याला दिलासा मिळाल्यासारखे वाटलं.
"हे ऐकून मला खूप आनंद झाला. तुम्हाला माहीत आहे, एका क्षणासाठी, जेव्हा तुम्ही म्हणालात की तो इथे नाही, तेव्हा माझ्या मनात विचार आला की...बरं, मला वाटलं की कदाचित तो मेला असावा." ट्रक वाला म्हणाला.
आता वज्रला खरंच घाम फुटला होता.
"माझ्या माहितीनुसार, मिसेस घोष आणि मिस्टर घोष याचं खूप छान जमतंय." वज्र म्हणाला. "त्याला अशी कहाणी पसरलेली आवडणार नाही. मला वाटतं की तुम्ही जे काही बोलत आहात ते त्याने ऐकल्यास तो तुमच्यावर खूप रागावेल."
"म्हणजे तो तिच्यासोबत खरोखर आनंदी आहे?" ट्रक चालकाने विचारलं.
"मी तेच तर तुम्हाला सांगतोय.”
“कदाचित, मी जास्तच बोलून गेलो. तू ते विसरून जा, मिस्टर घोष यांना काही सांगू नकोस.”
"तू पण ते विसरून जा.अशा प्रकारच्या बोलण्यामुळे खूप मोठा गोंधळ होऊ शकतो."—वज्र
तो ट्रक मध्ये बसला, दरवाजा जोरात बंद केला आणि निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून वज्रच्या लक्षात आले की त्याने वज्रला घाबरवले होतं.?
वज्रच्या मनात विचारांचे काहूर माजले होतं. म्हणजे सांझीचे आधी लग्न झालं होतं. तिचा नवरा भयानक मृत्यूने मेला होता, आणि काही पैसे गायब झालं होतं. घोषचाही तसाच मृत्यू झाला होता, आणि कदाचित, जर वज्रने तिजोरीचा दरवाजा जोरात बंद केला नसता, तर त्यातलेही पैसे गायब झालं असते.
वज्रचे मन आता भीती आणि संशयाने भरून गेले होतं.
ट्रक ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना वाटलं होतं की सांझीने केवळ पैसेच घेतले नाहीत, तर तिने तिच्या पहिल्या नवऱ्याची हत्याही केली होती.
तिने घोषची सुद्धा हत्या केली होती का?
वज्र त्या प्रसंगाचा विचार करू लागला, वज्रने तिला दिवाणखान्यात येताना पाहिलं होतं तिच्या हातात बंदूक होती. त्याला घोष आठवला, रागाने चेहरा लाल झालेला, तो उभा राहत होता.
वज्रने तिजोरीचा दरवाजा जोरात बंद करत असताना सांझी त्याच्याकडे पाहत होती, मग वज्रला पुन्हा बंदुकीचा आवाज ऐकू आला होता.
तेव्हा त्याला वाटलं होतं की तिजोरीचा दरवाजा बंद होण्याच्या आवाजामुळे तिने चुकून बंदुकीच्या ट्रिगरवर बोट घट्ट दाबले होतं. बंदूक चालली होती आणि घोष मारला गेला होता.
अपघाताने?
'अपघाताने' हा शब्द आता महत्त्वाचा होता.
तिच्यावर पहिल्या नवऱ्याच्या हत्येचा संशय होता आणि पैसे गायब झालं होतं. घोषवर गोळीबार जाणीवपूर्वक केला होता का?
ते अपघातासारखे दिसत होतं, पण अखेरीस ती हत्याच होती का? तिने हत्येचा आरोप वज्रवर टाकला असता.
मग त्याला एक दुसरी कल्पना सुचली, पण त्यामुळे त्याच्याच हृदयाची धडधड वाढली.
ती बंदुक घेऊन खोलीत आली तेव्हा तिजोरीचा दरवाजा उघडा होता.
समजा, तिने आधी घोषला, मग वज्रला गोळी मारण्याची आणि नंतर तिजोरीतून पैसे घेण्याची योजना आखली असती तर? समजा हीच तिची योजना असती तर? तिने पैसे लपवून पोलिसांना बोलावले असते. तिची कहाणी अशी असती की, वज्र तिजोरी उघडत असताना तिने आणि घोषने त्याला पकडले होतं. त्यामुळेच वज्रने घोषची हत्या केली होती. कोणत्या तरी युक्तीने तिने वज्रकडून बंदूक हिसकावून घेतली आणि आत्मसंरक्षणासाठी वज्रला गोळी मारली. वज्र म्हणजे नाशिक जेल मधून पळून आलेला एक गुन्हेगार होता, एक कुप्रसिद्ध माणूस. पोलीस अशी कहाणी सहजपणे स्वीकारू शकले असते..
पण तिने वज्रला मारलं नाही, कारण तिने घोषला गोळी मारताच वज्रने तिजोरी बंद केली होती. तिला हे समजण्याइतकी ती हुशार होती की ती तिजोरी उघडू शकत नाही, पण वज्र उघडू शकतो. जेव्हा तिला कळलं की वज्र तिजोरी उघडण्यासाठी तिच्या ब्लॅकमेलला बळी पडणार नाही, तेव्हा तिच्या मनात अचानक बदल झाला आणि तिने वज्रवर प्रेम करण्याचे नाटक केलं. जेव्हा तिला कळलं की इथे तिजोरी उघडणारा वज्र एकटाच नाही, अथांग पण आहे तेव्हा ती अचानक वज्रशी वैर-भावाने वागू लागली!
तिच्याकडे बंदूक होती. ती बंदूक नष्ट केल्याची तिची कहाणी खोटी होती याची आता वज्रला खात्री पटली होती.
याचा अर्थ अथांग आणि वज्र दोघांचाही जीव धोक्यात होता. ती अथांगला तिजोरी उघडायला लावू शकली असती, मग त्याला मारून टाकू शकली असती. ती वज्रलाही मारू शकली असती. तिने घोषला गोळी मारली तेव्हाच वज्रला मारलं असते, तर तिने जी कहाणी सांगितली असती, त्याच प्रकारची कहाणी ती आताही सांगू शकली असती.
हा केवळ एक अंदाज होता, जो एका ट्रक चालकाच्या बोलण्यामुळे वज्रच्या मनात आला होता. शक्यता अशीही होती की त्या फडने आत्महत्या केली होती आणि घोषला गोळी लागणे हा एक अपघात होता, पण वज्र कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हता. मला तिचे ते कठोर हिरवे डोळे आठवले. तिला धडा शिकवण्याचा एकच मार्ग होता. तिजोरीतून पैसे घ्यायचे आणि तिजोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा., जेणेकरणून तिला कळेल की अथांगवर दबाव टाकण्यात किंवा वज्रची हत्या करण्याची योजना आखण्यात काही अर्थ नाही. फक्त वज्रला पैसे लपवण्याची एक सुरक्षित जागा शोधावी लागणार होती, पण ते काही कठीण नव्हते.
वज्रने घड्याळात पाहिलं, सकाळी दहा वाजून दहा मिनिटे झाली होती. अथांग आणि सांझी दुपारपर्यंत परत येणार नव्हते. वज्र ते पैसे घोषला पुरलेल्या खड्ड्यातच पुरणार होता. जर तिला ते पैसे हवं असतील, तर तिला त्यालाही खणून बाहेर काढावे लागले असते.
ही एक चांगली कल्पना होती, पण ती यशस्वी झाली नाही कारण एक जुनाट कार दुरुस्तीसाठीए धाब्यावर आली आणि ते काम सांझी आणि अथांग येई पर्यंत चालूच राहिलं.
###
पुढचे काही दिवस तिजोरी जवळ जायला वेळ मिळालाच नाही. सांझी नेहमी आसपास असायची. तिने रात्र पाळी करणं सोडून दिले होतं, वज्र आणि अथांग दोघेच ते करायचे, ती झोपायला जायची.
आता ती वज्रशी बोलत होती, पण तिच्या वागण्यात एक प्रकारचा दुरावा होता, त्याच्या लक्षात की अथांग आल्यापूर्वी जसे त्यांचे संबंध होतं, तसं आता राहू शकत नाहीत. वज्रने तिला स्पर्श करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याला तिला स्पर्श करायचाही नव्हता. वज्रला तिच्यावर संशय होता, तो सतत तिच्याकडे संशयाने पाहत होता की ती उसकी हत्या करण्याचा कट रचत आहे का, पण तसं कोणतेही चिन्ह दिसलं नाही.
वज्र अथांगकडेही पाहत होता, तिच्यासोबत हल्दियाला गाडीने जाऊन आल्यानंतर त्याच्या वृत्तीत काही बदल झाला आहे का हे पाहण्यासाठी तो उत्सुक होता, पण इथेही त्याला कोणताही बदल दिसला नाही.
वज्र काही दिवस थांबला. या आशेने की लवकरच ती आणि अथांग पुन्हा हल्दियाला जातील, आणि त्याला तिजोरीपर्यंत पोहोचता येईल.
सुमारे एका आठवड्यानंतर ती संधी मिळाली, जेव्हा रात्रीच्या जेवणाच्या गर्दीनंतर आवराआवर करत असताना सांझी म्हणाली,
"हल्दियामध्ये एक चांगला रोमँटिक सिनेमा लागला आहे. मला तो पाहायचा आहे. तुमच्यापैकी कोणी येणारे का?"
अथांगने मान हलवली.
"मी नाही - मी फक्त हाणामारीचे सिनेमे पाहतो."
हीच ती संधी होती जी वज्र शोधत होता. ते दोघे गेले असते तर पहाटे तीन वाजण्यापूर्वी परत येणार नव्हते. तिजोरीतून पैसे काढून ते परत येण्यापूर्वी पुरून ठेवण्यासाठी त्याला हवा तितका वेळ मिळणार होता. मध्यरात्रीनंतर त्याला कोणत्याही व्यत्ययाची काळजी करावी लागणार नव्हती.
"मी इथे अडकलो आहे, अथांग," वज्र म्हणाला. "मी हल्दियाला जाऊ शकत नाही. तसंही आज रात्रीच्या ड्युटीची माझी पाळी आहे. एक संधी घेऊन बघ कदाचित तुला त्या रोमांटिक अभिनेत्रीमध्ये काहीतरी आवडेल."
त्याने वज्रकडे गोंधळून पाहिलं.
"त्यापेक्षा मी पत्ते खेळणे पसंत करेन."
"सांझीसाठी एकटीने वीस किमी जाणे खूप कठीण होईल. तू जा. " वज्र त्याला म्हणाला. सांझी वज्रकडेच पाहत होती, पण ही एक संधी होती जी वज्रला घ्यायचीच होती.
"तुम्ही माझ्यावर काही उपकार करण्याची गरज नाही. मी एकटीही जाऊ शकते." सांझी म्हणाली.
अथांग अचानक हसला.
"ठीक आहे,चल जाऊया." अथांग म्हणाला.साडेनऊच्या सुमारास, सांझी बंगल्यातून बाहेर आली. तिने उत्तान ड्रेस घातला होता जो वज्रने आधी कधी पाहिला नव्हता. वज्रने तिला अथांगच्या शेजारी गाडीत बसताना पाहिलं. इंजिन सुरू करताना तो वज्रकडे पाहून हसला.
"ही तुझी कल्पना होती मित्रा: माझी नाही." अथांग म्हणाला.
"मजा करा," वज्र म्हणाला.
सांझी वज्रकडेच पाहत होती. तिचे हिरवे डोळे उपहासाने भरलेले होतं.
"आम्ही करू. जागेवरून पळून जाऊ नकोस." सांझी म्हणाला.
अथांगने गाडी चालू केली.
मध्यरात्री पर्यंत पंपावर अधून मधून वाहने येत राहिली वज्रने ठरवलेलं काम म्हणजे तिजोरी उघडणे आणि पलाश ला पुरलेला खड्डा पुन्हा खणणे हे त्या नंतरच सुरू करता येणार होतं.
मध्यरात्री नंतर एक गाडी आली आणि त्यातून दोन माणसं खाली उतरली.
दोघांमधे काहीतरी होतं जे वज्रला आवडलं नाही. ते धोकादायक आहेत अशी त्याला सहज जाणीव झाली. ‘जरा विसावा’ मधे आल्यापासून ही पहिलीच वेळ होती की वज्रला अचानक जाणीव झाली की आपण एकटे आहोत, आणि हे एक एकाकी ठिकाण होतं.
एक माणूस वज्रकडे न्याहाळून पाहत होता, तर दुसरा माणूस आजूबाजूला पाहत होता, त्याचे कठोर, निर्विकार डोळे सावल्यांमध्ये काहीतरी शोधत होतं.
"मी टाकी भरू का?" वज्रने पेट्रोलचा नळ काढून विचारलं.
"हो, भर," तो म्हणाला.
पांढरा टाय घातलेला माणूस गाडीतून बाहेर आला, तरीही तो आजूबाजूला पाहत होता. वज्रने पंप चालू करून गाडीत पेट्रोल भरायला सुरुवात केली, तेव्हा वज्र त्याच्याकडे पाहत होता. त्याने आपली टोपी काढली आणि त्याने स्वतःला वारा घालू लागला. त्याचे विरळ, काळे केस घामाने ओले झाले होतं.
"आज खरंच खूप गरम आहे," वज्र म्हणाला. वज्र फक्त बोलण्यासाठी बोलत होता. या दोघांमुळे त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याला वाटलं की ते आपल्या डोक्यात मारून गल्ल्यातील पैसे लुटतील. मग वज्रच्या मनात एक विचार आला ज्यामुळे वज्रच्या अंगावर काटा आला. समजा त्यांना बंगल्यातील तिजोरी सापडली तर...!
"हे तुझं दुकान आहे का?" त्याने अचानक विचारलं. "तुझी बायको आणि मुलं इथे आहेत का?"
हा असा प्रश्न होता जो कोणीही विचारू शकला असता, पण तरीही, त्याच्या तोंडून तो ऐकताना त्यात काहीतरी अशुभ वाटत होतं.
"मी फक्त कामावर ठेवलेला माणूस आहे," वज्र पंपावरील डायल फिरताना पाहत म्हणाला. "माझा बॉस आणि दुसरा कामावरचा माणूस आता कोणत्याही क्षणी येतील."
वज्रने पंप बंद केला, मग बादलीतून स्पंज काढला आणि विंडशील्ड पुसायला सुरुवात केली.
"चल, काहीतरी खाऊया, सुलतान ," पांढऱ्या टाय घातलेल्या माणसाने दुसऱ्याला म्हटले.
त्याने वज्रकडे पाहिलं. "काय आहे तुझ्याकडे, पोरा? "
"या वेळी फक्त सँडविच आहेत," वज्र म्हणाला.
"सँडविचपेक्षा काहीतरी चांगलं दे. "
वज्रने चोरून आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिलं. मध्यरात्रीनंतर वीस मिनिटे झाली होती.
सांझी आणि अथांग किमान अडीच तास तरी परत येणार नव्हते. असं दिसत होतं की वज्र या दोघांसोबत अडकला होता.
तो जेवणाच्या खोलीकडे गेला. दोन्ही माणसे वज्रच्या मागे आरामात चालत आली. ते खोलीच्या आत थांबले आणि आजूबाजूला पाहू लागले.
"इथे आणखी कोणी आहे का?" पांढरा टाय घातलेल्या माणसाने विचारलं.
तो स्वतःच सहज शोधू शकला असता, म्हणून वज्र म्हणाला की इथे दुसरे कोणी नाही.
"चला खाऊया: तुझ्याकडे काय आहे आणखी ?"
"तुम्ही वाट पाहणार असाल तर आम्लेट मिळेल आणि सँडविच आहेतच."
सुलतान वज्रच्या पुढून गेला, काउंटरच्या पलीकडे गेला, स्वयंपाकघराचा दरवाजा ढकलून उघडला आणि आत पाहिलं. तो पांढरा टाय घातलेल्या माणसाकडे मान हलवत परत आला.
तेव्हा वज्रला कळलं की आपण संकटात सापडलो आहोत.
पांढरा टाय घातलेला माणूस म्हणाला, "इथे हा एकच फोन आहे का?" त्याने भिंतीवरील टेलिफोनवर थाप मारली.
"हो," वज्र म्हणाला. त्या माणसाने टेलिफोनचा रिसीव्हर हातात घेतला आणि त्याची तार तिच्या जागेवरून ओढून तोडली. "आम्लेट करायला घे. तू त्याच्यावर लक्ष ठेव, सुलतान ."
वज्र सुलतान सोबत स्वयंपाकघरात गेला, तो वज्रच्या अगदी मागेच होता आणि वज्र जड श्वास घेत होता.
"काय प्रकार आहे हा?" वज्र म्हणाला.
"शांत हो, " सुलतान टेबलावर बसत म्हणाला. उसका जाड, हात त्याच्या बंदुकीच्या मुठीवरून फिरत होता. मग तो म्हणाला,
"तुला इथे आवडतं का? तुला इथे एकटं वाटत नाही का?"
"मला सवय झाली आहे," वज्र म्हणाला, आपल्या ओठांना कोरडेपणा आल्याची आणि हृदयाची धडधड वाढल्याची जाणीव होत होती.
"लग्न झालंय का तुझं?"
"नाही."
पांढरा टाय घातलेला माणूस आत आला, त्याच्या हातात सँडविचची एक प्लेट होती, त्याने जेवणाच्या खोलीतील काचेच्या कपाटातून घेतली होती.
"घे, सुलतान हे इतके वाईट नाहीत.या पोरावर लक्ष ठेव आणि त्याला गुंतवून ठेव. मी जरा आजूबाजूला पाहून येतो."
सुलतान ने दोन सँडविच उचलले आणि खायला सुरुवात केली. पांढरा टाय घातलेला माणूस बाहेर गेला.
"हा डॅड , डेंजरस आहे." सुलतान वज्रला म्हणाला. "त्याच्याशी हळुवारपणे वागावं लागतं. त्याला लगेच राग येतो, पण त्याच्याशी नीट वागल्यास तो चांगला आहे."
वज्र काहीच बोलला नाही. बोलायला काहीच नव्हतं, पण वज्र खूप विचार करत होता.
या जाड माणसाला आवर घालणं फारसं अवघड वाटत नव्हतं. एका वेळी एकाचा सामना करणं वज्रला फारसं अवघड वाटत नव्हतं.
सुलतान म्हणाला, "या हॉटेलातल्या गल्ल्यात किती पैसे आहेत?"
"जास्त नाहीत," वज्र म्हणाला. "आम्ही आजच दुपारी बँकेत पैसे जमा केले."
"होय का? हे वाईट झालं. आम्हाला पैसे हवं आहेत आम्हाला त्यांची खूप गरज आहे." त्याने आणखी दोन सँडविच उचलले आणि ते आपल्या तोंडात कोंबायला सुरुवात केली.
"आम्हाला वाटलं होतं की अशा हॉटेलात कुठेतरी भरपूर पैसे लपवलेले असतील."
"कॅश काउंटरमध्ये सात-आठशे रुपये आहेत," वज्र म्हणाला.
"त्यापेक्षा खूप जास्त पैसे असायला हवेत." तो म्हणाला.
"तुला आणखी काहीतरी शोधावं लागेल, मित्रा," तो म्हणाला. "डॅड असा माणूस नाही ज्याला तू थाप मारून थांबवू शकशील." सुलतान म्हणाला आणि वज्रच्या मस्तकात सणक गेली.
मनगटाच्या एका झटक्याने त्याने तव्यातील पदार्थ त्याच्या जाड चेहऱ्यावर फेकले.
गरम तेलामुळे तो ओरडला आणि मागे डगमगला. आम्लेट त्याच्या तोंडावर चिकटलं. काही तुकडे त्याच्या शर्टात अडकले. त्याने वेड्यासारखा हाताने आपली बंदूक शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी वज्रने गरम तव्याने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार केला. मग तो मागे डगमगत असताना, वज्रने पुढे उडी मारली आणि त्याच्या जबड्याच्या बाजूला एक जोरदार ठोसा मारला. तो खाली पडला. त्याच्यावर वाकून वज्रने उसकी बंदूक खेचली. तो उठण्याचा प्रयत्न करत असताना, वज्रने बंदुकीच्या दस्ताने त्याच्या कपाळावर मारलं. तो खाली कोसळला आणि त्याचे डोळे फिरले.
आता वज्रकडे उसकी बंदूक होती.....
वज्रला जेवणाच्या खोलीचा दरवाजा कर्कश आवाजात उघडल्याचा आवाज आला. त्याने पटकन दिवा बंद केला.
वज्रने डॅड ला कमी लेखले नव्हते. तो एक व्यावसायिक मारेकरी होता. पण निदान वज्रकडे आता बंदूक तरी होती.