Get it on Google Play
Download on the App Store

रुखवताचे उखाणे (Marathi)


मराठी उखाणे
रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई. पतीचे नाव घेताना जसे उखाणे घालतात तसेच ते 'रुखवता'चे वेळीहि घालतात. मात्र या प्रकारच्या उखाण्यामध्ये अतिशयोक्तीची भाषा अधिक असते वा विनोदाला भरपूर वाव दिला जातो. म्हणून अशा उखाण्यांना फोडणी अगर लवंगी मिरचीची उपमा दिली जाते. 'रुखवता'साठी वापरल्या जाणार्‍या उखाण्यांच्यामुळे कित्येकदा लग्नघरातील वातावरण भारी तंग होऊन भांडणे उभी राहतात. परंतु- "आला आला रुखवत, त्यावर ठेवला भोत,वाकडा तिकडा आणा घालू नका दुहीकडच जमलय गोत" असा इषारा देऊन त्याला पायबंद घातला जातो!
READ ON NEW WEBSITE