BookStruck: We tell Stories

Over last 6 years BookStruck has been helping hundreds of talented Indian authors publish their SciFi, Horror, Fantasy and Mythology based work.

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

फळविक्रेत्या शेवंताबाई

शेवंता बाईचे लग्न फार लहानपणी झाले होते. ४ बाळंतपणे होऊन ४ मुली झाल्या होत्या. पाचव्या बाळंतपणात मुलगा झाला तरच घरी परत ये म्हणून सासरच्या लोकांनी तिला ३ऱ्या महिन्यातच माहेरी पाठवले होते. शेवंता बाई फारच चिंतीत होत्या. दर संध्याकाळी दत्तगुरूंच्या मंदिरात त्या भजनाला जाऊन बसत आणि रात्री इतर बायका बरोबर चालत घरी येत. घर कोंकणात होते त्यामुळे वाटेवर नारळ आणि काजूची झाडे लागत असत.

काही आठवड्यांतच शेवंता बाईनी अनेक मैत्रिणी केल्या. बहुतेक स्त्रिया लग्न होऊन गावांत सून म्हणून विविध ठिकाणहून आल्या होत्या. कोणी बेळगाव मधून तर कुणी कारवार तर कुणी सातारा कडून. अश्यांत एक विचित्र मैत्रीण होती ती म्हणजे सावित्री. सावित्री शेवंता बाईच्या घरी येऊन भेटायची, वसपूस करायची त्यांच्या बरोबर चालत चालत दत्तगुरूंच्या मंदिराजवळ सुद्धा यायची पण निम्मित करून परत जायची. इतर कुना बायकाना सावित्री अजिबात आवडायची नाही. सावित्री अनेकदा गरोदर राहून तिची मुले पडली होती असे स्त्रिया कुजबुजत असत आणि तिच्या संगतीला राहणे म्हणजे आपल्यावर काही तरी संकट येईल असेच त्या बायकांना वाटत होते.

शेवंता बाईना मात्र सावित्री विचित्र वाटली तरी प्रेमळ वाटत असे. ती म्हणे त्यांची फार चांगली वासपूस करत असे, तिचा आहार, आरोग्य ह्याविषयी तिला फार चांगले सल्ले देत असे इत्यादी.

एका शनिवारी शेवंता बाईना त्यांच्या वडिलांनी भजन झाल्यानंतर मंदिरातच राहायला सांगितले. ते बाजूच्या दुकानात काही तर सामान आणायला जाणार होते आणि लेकीबरोबरच चालत घरी जाऊ असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे भजन संपल्यावर शेवंताबाई मंदिरातच थांबल्या आणि त्यांच्या मैत्रिणी चालत घरी गेल्या. मंदिरात भटजीबोवा आणि त्यांची पत्नी साफ सफाई करत होत्या त्यामुळे घाबरायची गरज नव्हती.

इतक्यानं बाहेर सोप्यावर बसलेल्या शेवंताबाईना मंदिराच्या दूरवर सावित्री दिसली. मैत्रीण दिसल्यावर शेवंता बाईनी तिच्या जवळ जाऊन तिच्याशी संवाद साधला.
"आग तुज्या वडिलांनी पाठवली मला. त्यांना सामान इथे भेटले नाही म्हणून ते गजाच्या दुकानावर गेलेत. तू पाहिजे तर माझ्या बरोबर चल घरी. नाही तर आम्ही दोघी गजाच्या दुकानावर जाऊन तुझ्या वडिलांना गाठू. "

शेवंताबाई गरोदर होत्या आणि खरेतर त्यांना लघवी झाली होती. वडील बरोबर असले तर कुठे जायला संकोच झाला असता त्यामुळे त्यांनी सावित्री बरोबरच जायचे ठरवले. दोघी जणी चालत घरी जाऊ लागल्या. त्याकाळी टॉर्च वगैरे नव्हता आणि शेवंताबाई नेहमी केरोसीनचा छोटा दिवा घेऊन जायच्या ज्याला कोकणात चिमणी म्हणतात. थोड्या सामसूम वाटेवर पोचल्यानंतर शेवंता बाईनी "आपण लघवीला दूर झाडीत जाते तू जरा सोबत दे" असा विषय काढला. सावित्री बाईनी होकार दिला.
झाडीत आपला कारभार उरकल्या नंतर शेवंता बाईनी नेसूचे ठीक केले आणि इतक्यांत सावित्रीच्या हातून चिमणी पडून फुटली आणि पालवली. शेवंता बाईनी त्या आवाजाने अंग काढले. त्या नेसूंच्या ठीक करताना त्यांचे वस्त्र थोडे हलले आणि त्याचे गरोदर पोट थोडे उघडे पडली. सावित्री बाईच्या डोळ्यांत एक फार वेगळी चमक शेवंताबाईना दिसलाय. त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची हाव दिसत होती. आपले दोनी हात त्यांनी शेवंताबाईचा पोटावर ठेवले आणि "तुझे बाळ मला देतेस का ग?" असं प्रश्न फार वेगळ्या घोगऱ्या आवाजांत केला.

शेवंता बाईनी उसने अवसान आणून तेथून "नाही नाही" म्हणत पोबारा केला. त्या अंदारातून कशाचीही पर्वा ना करता हनुमान स्तोत्र म्हणत पळत घरी गेल्या. त्यांची अवस्था पाहून घरी सगळेच लोक हादरले. त्याचे वडील काही वेळाने घरी पोचले "अग मी थांब म्हणून सांगितले असताना कशाला स्वतःहून आली ? " म्हणून ते ओरडले ते वेगळेच.

नंतर स्पष्ट झाले कि वडील गजाच्या दुकानावर गेले नव्हतेच. सावित्रीने खोटे बोलले होते. शेवंताच्या वडिलांनी सावित्रीच्या घरी जाऊन जाब विचारला तर सावित्रीने अतिशय अभद्र अश्या शिव्या दिल्या. अश्या शिव्या बहुतेक करून खारवी समाजातील लोक देत असत. सावित्री मडवळ समाजातील होती. त्या शिव्या ऐकून सावित्रीच्या घरातील लोक सुद्धा अचंभित झाले. त्यानंतर त्यांनी सरळ नारायण भटजींना पाचारण केले. नारायण भटजी म्हणजे भूत वगैरे काढणे करणारे तांत्रिक. त्यांनी हे प्रकरण निस्तरायला नकार दिला. शेवटी परिवाराने सावित्रीला टेम्पोत घालून बेळगावी नेले. तिथे एका हनुमान मंदिरात एका प्रसिद्ध सिद्धाने तिला भूतमुक्त केले. तिथून एक नवीन कथा पुढे आली. सावित्री नवीन सून म्हणून आली असताना शेजारच्या एका वृद्ध खारवी महिलेबरोबर तिची ओळख झाली आणि दोघांना एक मेकांचा लळा लागला. वृद्ध महिलेने पतीला न सांगता पैसे साठवून आपल्या साठी एक सोन्याचे कंकण केले होते. पती समोर ती ते कधीही घालत नसे. तिने ते घरांत एका बरणीत लपवून ठेवले होते. काही महिन्यांनी त्या वृद्ध महिलेला काही तरी रोग झाला आणि ती मरणशय्येवर पडली होती. सावित्रीला कंकणाचा लोभ होऊन तिने तिची शेवटच्या दिवसांत सेवा केली. सावित्रीला वाटले कि मारताना म्हातारी कंकण आपल्याला ठेव म्हणेल. पण प्रत्यक्षांत उलटे घडले. "ते कंकण आपल्या पतीला देण्याची जबाबदारी तुझी हो" असे सांगून म्हातारी मेली.

सावित्रीने वचन पळाले नाही. ते कंकण ती घरी घेऊन आली. त्या कंकणामुळेच त्या म्हातारीचे भूत सावित्रीला छळू लागले.

टीप : खरेतर ह्या प्रकाराकडे शास्त्रीय दृष्टीने पहिले जाऊ शकते. सावित्रीने चोरी केली होती आणि तिच्या मनात ते सलत होते. त्याच मुळे तिचा स्वभाव विक्षिप्त झाला असावा. एकदा त्या सिद्धा कडे जाऊन मन मोकळे केले कि तिचा guilt जाऊन मन मोकळे झाले असावे. शेवंताबाईना पाचवा मुलगा झाला आणि त्यानंतर आणखीन २ मुलगे झाले. सावित्रीबाई सुद्धा गरोदर राहून त्यांना एक गोंडस बाळ झाले. सावित्रीबाई आणि शेवंताबाई आज सुद्धा मैत्रिणी आहेत.