Get it on Google Play
Download on the App Store

त्रिविष्टप

हा प्रदेश म्हणजे आजचा संपूर्ण चीन रशियाचा काही भाग, तिबेट, नेपाळ आदि मिळून बनला आहे .  त्रिविष्टप मधूनच आधुनिक नाव तिबेट उत्पन्न झाले असे मानतात.

पौराणिक साहित्यात त्रिविष्टप नावाच्या स्वर्गाचाही उल्लेख आहे. प्राचीन कालपासूनच तिबेट ही सिद्ध पुरुषांची भूमी मानली गेली आहे. तिबेट हा प्रदेश अत्यंत उंचावर देखील स्थित आहे. यावरूनच त्रिविष्टप म्हणजे स्वर्ग वरती असतो हे संकल्पना उदयास आली असावी. त्याचप्रमाणे कैलास म्हणजे शिव शंकराचे निवास स्थान देखील तिबेट मध्ये म्हणजे त्या काळच्या स्वर्गात स्थित होते असे म्हणणे चूक ठरणार नाही. कालिदासाने मानसरोवर आणि अलकानगरी यांचा उल्लेख देखील केला आहेच. हे देखील या प्रदेशाच्या जवळ स्थित आहेत.

विष्टप या शब्दाचा अर्थ भुवन किंवा घर असा होतो. अर्थात ब्रम्हा विष्णू महेश या त्रिमुर्तींचे निवासस्थान म्हणून याला त्रिविष्टप म्हटले असावे.