Get it on Google Play
Download on the App Store

अपरांत

पश्चिम भारतातील एक देश अथवा देशसमूह म्हणजे अपरांत . या देशाच्या व्याप्तीविषयी प्राचीन साहित्यात एकवाक्यता नसल्यामुळे त्याचे निश्चित स्थान ठरविणे कठीण आहे. ‘अपरांत’ याचा शब्दश: अर्थ ‘पश्चिमेकडील अथवा पश्चिम सरहद्दीवरील देश’ असा होतो.

 प्राचीन साहित्यक याची अपरांतक, कुट्टापरांत, अपरंध्र, शूर्पारक, अरियके, अपलत अशी भिन्न नावे आढळतात. पौराणिक साहित्यात निर्देशिल्याप्रमाणे पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा आधुनिक कोकणपट्टीचा प्रदेश म्हणजे ‘अपरांत’ देश होय. 

प्राचीन काळी ‘मरहट्ट’ व ‘अपरांत’ हे देश स्वतंत्र मानले जात असत. महाभारतातील परशुरामाच्या पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याच्या आख्यायिकेवरून ‘कुट्टापरांत’ ‘अपरंध्र’ अशी वैकल्पिक नावे असलेला ‘अपरांत’ देश हाच असावा असे अनुमान निघते. याचे ‘शूर्पारक’ असेही एक वैकल्पिक नाव आढळते. 

  • रघवंशाच्या मल्लिनाथकृत टीकेमध्ये देशाची राजधानी  शूर्पारक  आजची सोपारा  होती.

  • तर ह्यहुएनत्संगच्या मते ती ‘कोंकणपूर’होती.  

  • अल्-बीरूनीच्या मते ‘तन’ म्हणजे आताच्या ठाणे गावी होती. 

हा प्रदेश दीर्घकालपर्यत सातवाहन राजांच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी नगरांचा संबंध ‘अपरांत’ देशातील शूर्पारक (सोपारा) व चौल बंदरांशी असल्याचा निर्देश नाणेघाट शिलालेखात आढळतो.