Get it on Google Play
Download on the App Store

शहाणा झालेला राजपुत्र 4

“मी बातमी काठून आणतो.” तो म्हणाला. खुशमस्क-या राजपुत्राकडे गेला. पहारेक-यांनी त्याला हटकले. तो म्हणाला,

“मी येथील राजाची करमणूक करणारा. तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे.”

नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.

“पाठवा त्याला.” राजपुत्र म्हणाला. खुशमस्क-या आला. राजपुत्राची तो करमणूक करू लागला. तो तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहीणही आली. थोड्या वेळाने खुशमस्क-या जायला निघाला.

“येत जा!” राजपुत्र म्हणाला.

“राजाने येऊ दिले तर!” तो म्हणाला.

खुशमस्क-या राजाकडे गेला व म्हणाला,

“राजा, राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हालाच शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा!”

“ठीक आहे.” राजा म्हणाला.

दुस-या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले. राजपुत्र आला, आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला,

“तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो.”

“ती माझी बहीण!”

“ती माझी राणी होऊ दे!”

“मी तिला विचारीन!”

“कळवा मला काय ते!”

राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीगत सांगितली. ती म्हणाली,

“राजाला सांग मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही!” राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले नि तो परत आला. राजा विचार करू लागला. इतक्यात तो खुशमस्क-या आला.