Get it on Google Play
Download on the App Store

मधुराणी 3

‘रानातील दलदलीखाली राजाच्या मुलीची हजार मोती आहेत. सूर्यास्तापर्यंत ती सारी शोधून काढली पाहिजेत. एकही जरी कमी भरले तरी शोधणारा संगमरवरी दगड होऊन बसेल!’

सर्वांत मोठा भाऊ रानात गेला व  मोत्यांचा शोध करू लागला. दिवस मावळण्याची वेळ होत आली, पाखरे घरट्यात जाऊ लागली. परंतु हजार तर दूरच राहिली, शंभर सुद्धा मोती त्याला मिळाली नव्हती. सूर्य सर्व खाली गेला व तो भाऊही दगड होऊन पडला!

दुस-या दिवशी मधला भाऊ त्या कामगिरीवर निघाला. परंतु भावाची गत तीच जी त्याचीही झाली. मोठ्या भावाने शंभर मोती जेमतेम गोळा केली होती; त्यात आणखी शंभराची मोठ्या  नतवारीने या भावाने भर घातली. परंतु अट पुरी झाली नाही. दिवस मावळला, गाई गोठ्यात गेल्या, पाखरे घरट्यात गेली. बाहेर अंधार पडला व हा मधला भाऊही दगड होऊन पडला!

शेवटी त्या बुटक्याची पाळी आली. त्या दलदलीजवळ येऊन तो शोधू लागला. पाहू लागला. तो आधीच लहान व अशक्त. मोती शोधून काढणे मोठे दगदगीचे व कंटाळवाणे काम होते. शेवटी वैतागून तो बसला एका दगडावर व रडू लागला. त्याने ज्या मुग्यांचे वारूळ वाचविले होते, त्या मुंग्याच्या राजाला ही गोष्ट कळली. पाच हजार कामकरी मुंग्या घेऊन तो जातीनिशी तेथे मदतीस धावून आला. लौकरच मोत्यांची रास त्यांनी तेथे तयार केली!

परंतु तेथे दुसरी फळी होती, तिच्यावर पुढीलप्रमाणे लिहिलेले होते-