Get it on Google Play
Download on the App Store

सिंहासन बत्तिशीची कथा क्र.17 (तथास्तु)

महाराजा विक्रमादित्यच्या नगरीतील प्रजेला कुठल्याच गोष्टीची‍ कमतरता नव्हती. राजा कधी कधी राज्यातील जनतेचा समाचार घेण्यासाठी वेश बदलून हिंडत असे.

एकदा राजा आपल्या नगरीत रात्री वेश बदलून हिंडत होता. एका झोपड‍ीत राजाला काही कुजबुज होत असल्याचे जाणवले. एक स्त्री आपल्या पतीला राजाला काही तरी सांगण्यासाठी सांगत होती. मात्र तिचा पती ते मान्य करत नव्हता कारण त्या गोष्टीने राजाच्या जीवाला धोका असल्याचे तो म्हणत होता.

राजा विक्रमने ते जाणून घेण्‍यासाठी त्या झोपडीजवळ गेला. दरवाज्याची कडी वाजविली. एक ब्राह्मण पत्नीने दरवाजा उघडला. राजाने आपला परिचय देताच ती घाबरली. राजाने ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ब्राम्हण दाम्पत्याचा विवाह होऊन 12 वर्ष झाली होती: ती‍ ते निपुत्रीक होते. त्याने पुत्र प्राप्तसाठी खूप काही केले पण त्यांना त्याचा फायदा झाला नाही.

ब्राह्मणाच्या पत्नीने राजाला सांगितले, ''एके दिवशी माझ्या स्वप्नात एक देवी आली. तिने सांगितले, तीस कोसावर पूर्व दिशेला एक घनदाट जंगल आहे. तेथे एक संन्यासी शिवाची आराधना करीत आहे. शिवाला प्रसन्न करण्यासाठी तो स्वत: चे अवयव होमकुंडात टाकत आहे. तेच जर राजा विक्रमादित्यने केले तर शिव प्रसन्न होईल व ब्राह्मण दाम्पतीला संतान प्राप्त होईल.

विक्रम राजाने त्यांची मदत करण्याचे ठरविले. जंगलाच्या वाटेने जात असताना राजाने प्रदत्त दोन वेताळांचे स्मरण केले. त्यांनी राजाला हवन स्थळी पोहचविले. तेथे तो संन्यासी आपल्या शरीराचा एकेक अवयव कापून अग्नि-कुण्डात टाकत होता. राजा विक्रम एका बाजुला बसला व त्यांच्या सारखे आपला एकेक अवयव कापून अग्नि कुण्डात अर्पण करू लागला. सारे जळून गेल्याने शिवगण तेथे उपस्थित झाला. व संन्यासीच्या अंगावर अमृत शिंपडून निघून गेला. मात्र तो राजा विक्रमाच्या अंगावर अमृत शिंपड्याचे विसरला. राजा विक्रम सोडून सारे जिवंत झाले.

संन्यासींनी राजा विक्रमाची राख तेथे पाहिली. त्यांनी पुन्हा शिवाची आराधना केली व राजा विक्रमला जिवीत करण्‍यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवने त्यांची प्रार्थना ऐकल्यावर अमृत टाकून विक्रम राजाला जिवंत केले. विक्रमने शिवशंकराचा नमस्कार केला व ब्राह्मण दाम्पत्याला संतान सुख देण्यासाठी प्रार्थना केली. शिवने 'तस्थास्तु' म्हटले व अदृश्य झाले. नंतर काही दिवसात ब्राह्मण दाम्तत्तीला पुत्ररत्न प्राप्त झाला. ते राज दरबारात जाऊन त्यांनी राजा विक्रमाचे आभार मानले.

सिंहासन बत्तिशी

संकलित
Chapters
गुराखी सिंहासन बत्तिशी - आरंभ कथा पहिली कथा दुसरी चित्रलेखा श्लोक १९ वा सिंहासन बत्तिशीची कथा क्र.3 (चंद्रकला) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.4 (कामकंदला) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 5 (लीलावती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 6 (रविभामा) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.7 (कौमुदी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 8 (पुष्पवती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 9 (मधुमालती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 10 (प्रभावती) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 11 सिंहासन बत्तिशीची कथा क्र.12 (मोहिनी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 13 सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 14. सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 15 (घोडे व उडणारा रथ) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.16 (पाताल नगरी) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.17 (तथास्तु) सिंहासन बत्तिशीची कथा क्र.18 (विश्वासघात) सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.19 (मन श्रेष्ठ की ज्ञान?)