Get it on Google Play
Download on the App Store

श्याम 134

तो सुका तुकडा माझ्याजवळ बोलत होता. मी त्याच्याजवळ बोलत होतो. घडीघडी तो तुकडा मी हृदयाशी धरीत होतो. माझ्या डोळयांतील पाणी त्याच्यावर पडले. त्या तुकडयावर मी प्रेमाश्रूंचा वर्षाव केला. तो त्या तुकडयावर वर्षाव नसून मला मिळालेल्या रामाच्या मूर्तींवर अभिषेक होता. शेवटी तो तुकडा मी माझ्या पोटातच ठेवला. मी म्हटले, 'हे माझ्या रामचे हृदय मला पोटातच ठेवू दे; म्हणजे ते कोणालाही दिसणार नाही.'

माझा व रामचा नंबर बहुधा जवळजवळच असे. आम्ही लांब जाऊ तरी कसे ! देवालाही आम्हाला दूर करताना वाईट वाटले असते. कधी राम वर असे तर कधी श्याम वर असे. कधी रामच्या डोक्यावर श्याम, तर कधी श्यामच्या डोक्यावर राम ! आम्ही एकमेकांस डोक्यावर घेऊन जणू नाचत होतो. रामची वही हातात घेऊन तिच्यावर मि चित्रे काढीत असे. मी काही चित्रकार नव्हतो. राम होता चित्रकार. मला काहीतरी लिहावेसे वाटे; परंतु काय बोलावे, काय लिहावे ते समजत नसे.

रामच्या वहीत मी चिमणीचे चित्र काढीत असे. च्ािंवचिंव करणारी चिमुकली चिमणी मला फार आवडत असे. चिमणी हे नाव मला आवडते. मला अजूनही चिमण्यांकडे बघत राहावे असे वाटते. चिमण्यांकडे कधी कधी घटका घटका मी पहात राहिलो आहे. आत्याकडे असताना चिमण्यांना दाणे फेकून त्यांची मौज पहात असे व स्वत:चे अश्रू पुशीत असे. मी माझ्या एका कवितेत-

"चिमणी येऊन
नाचून बागडून
काय म्हणे मला ?
चिंवचिंव करीन
चिंता हरीन
हस रे माझ्या मुला'

असे चरण घातले आहेत. ते चरण उगीच गंमत म्हणून घातलेले नाहीत. त्या चरणांत आत्याकडचे माझे सारे जीवन मी ओतलेले आहे.

अशी मी माझ्या जीवनात येऊन बसलेली चिमणी; माझ्या जीवनात संगीत व आनंद आणणारी ही चिमणी; तिचे चित्र मी रामच्या वहीत काढीत असे. शिक्षक तिकडे शिकवीत असत, परंतु मी माझ्या हृदयातील चिमणी तेथे चितारीत असे. मी साध्या चिमणीचे चित्र काढीत नसे; तर पिलांसाठी चोचीत चारा घेऊन जाणारी मायाळू चिमणी काढीत असे.

माझ्या चिमणीत अपार अर्थ असे, असे मला वाटते. माझ्या आईचे प्रेम का त्या चित्रात मी दाखवीत असे ? माझी आई का त्या वेळेस नकळत माझ्या हृदयात येऊन बसत असे ? घास तोंडात घालताना माझी आठवण काढणारी माझी आई, ती का त्या वेळेस मी स्मरत असे ? का माझ्या शतजन्मावधी भुकेलेल्या जिवाला प्रेमाचा घास घेऊन येणारा हा जो रामरुप पक्षी, त्याचे दर्शन त्या चिमणीत मी घेत असे ? त्या चित्रातील भाव कोणताही असो. रामला व मला दोघांनाही चिमणीचे वेड लागले होते, एवढे खरे एखादे दिवशी श्याम जर बोलला नाही. रुसलेला, त्रासलेला दिसला तर राम त्याला म्हणावयाचा, 'पिलांना घास घेऊन जाणारी चिमणी काढ ना माझ्या वहीत ! ही घे वही, काढ ना !' रामचे ते शब्द ऐकताच श्याम का नाही म्हणेल ? मी लगेच त्या वहीत चिमणी चितारावयाचा. रामच्या वहीत जिकडे तिकडे चिमण्याच चिमण्या झाल्या होत्या. आमच्या प्रेमाला पंख फुटून जणू ते जिकडे तिकडे नाचत होते !

श्याम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
श्याम 1 श्याम 2 श्याम 3 श्याम 4 श्याम 5 श्याम 6 श्याम 7 श्याम 8 श्याम 9 श्याम 10 श्याम 11 श्याम 12 श्याम 13 श्याम 14 श्याम 15 श्याम 16 श्याम 17 श्याम 18 श्याम 19 श्याम 20 श्याम 21 श्याम 22 श्याम 23 श्याम 24 श्याम 25 श्याम 26 श्याम 27 श्याम 28 श्याम 29 श्याम 30 श्याम 31 श्याम 32 श्याम 33 श्याम 34 श्याम 35 श्याम 36 श्याम 38 श्याम 39 श्याम 40 श्याम 41 श्याम 42 श्याम 43 श्याम 44 श्याम 45 श्याम 46 श्याम 47 श्याम 48 श्याम 49 श्याम 50 श्याम 51 श्याम 52 श्याम 53 श्याम 54 श्याम 55 श्याम 56 श्याम 57 श्याम 58 श्याम 59 श्याम 60 श्याम 61 श्याम 62 श्याम 63 श्याम 64 श्याम 65 श्याम 66 श्याम 67 श्याम 68 श्याम 69 श्याम 70 श्याम 71 श्याम 72 श्याम 73 श्याम 74 श्याम 75 श्याम 76 श्याम 77 श्याम 78 श्याम 79 श्याम 80 श्याम 81 श्याम 82 श्याम 83 श्याम 84 श्याम 85 श्याम 86 श्याम 87 श्याम 88 श्याम 89 श्याम 90 श्याम 91 श्याम 92 श्याम 93 श्याम 94 श्याम 95 श्याम 96 श्याम 97 श्याम 98 श्याम 99 श्याम 100 श्याम 101 श्याम 102 श्याम 103 श्याम 104 श्याम 105 श्याम 106 श्याम 107 श्याम 108 श्याम 109 श्याम 110 श्याम 111 श्याम 112 श्याम 113 श्याम 114 श्याम 115 श्याम 116 श्याम 117 श्याम 118 श्याम 119 श्याम 120 श्याम 121 श्याम 122 श्याम 123 श्याम 124 श्याम 125 श्याम 126 श्याम 127 श्याम 128 श्याम 129 श्याम 130 श्याम 131 श्याम 132 श्याम 133 श्याम 134 श्याम 135 श्याम 136 श्याम 137 श्याम 138 श्याम 139 श्याम 140 श्याम 141 श्याम 142 श्याम 143 श्याम 144 श्याम 145 श्याम 146 श्याम 147 श्याम 148