Get it on Google Play
Download on the App Store

प्रवेश सोळावा 4

राघू
(गझल)
धर्मवरी हो चला । झुंज आज लागलें ।
धर्मबंधूंसाठीं या। देऊं आपुले गळे ।
गर्जनाकराउठा  । त्याग थोर या करूं ।
मोह सर्व सोडुनी । संकटास आदरूं ॥
भेदभाव जाळुनी । बंधु सर्व होऊं या ।
मायभूमि आपुली । सर्व मिळू सेवूं या ॥
भराभराचला चला । होमकुंड पेटलें ।
घेऊं त्यांत हो उडया । चित्त आज चेतलें ॥
पाश मायभमिचे ।  खंबुनी दुरी करूं ।
कष्टयोनि या तनू । धर्मकार्यि या मरूं ॥
देव आपुला सखा । पाठिशीं सदा खरा ।
व्हावया स्वतंत्र हा । मार्ग आपला बरा ॥

लक्ष्मीधरपंत -  वा, राघू ! अगदीं शुध्द म्हणतोस ! कुणी शिकवलं ?

राघू -  बालवीरांबरोबर शिकलों.

लक्ष्मीधरपंत -  खरेंच राघू, तुझ्या बालवीर शिक्षकांना बोलावून आण. त्यांच्याशीं माझें जरूरीचें काम आहे.

नारायण - (स्वगत) बालवीरांच्या संगतींत राघू बराच सुधारला. योग्य संगति व वळण जर मिळेल, तर हीं रानांत सुकून जाणारीं फुलें टवटवीत होतील, त्यांना आपा अस्पृश्य व बूध्दिहीन म्हणतों, पण त्यांची जोपासना केली, म्हणजे तिथेंच आपणांस हिरे मिळतील. त्यांची जोपासना करणारें शेंकडो लाखों निघाले पाहिजेत. (पांडबा येतो.)

पांडबा -  रामराम, दादा ! बरे आहेत ना नाना ?

लक्ष्मीधरपंत -  बरा आहे. आतां जरा अशक्तपणा आहे.

पांडबा -  मी राघूजवळ म्हटलं होतें कीं, मी आपल्या भेटीस येईन म्हणून !

नारायण -  त्यानं सांगितलें. राघू आतां येईल. (राघू व बालवीर शिक्षक येतात.)

लक्ष्मीधरपंत
-  या, मास्तर