Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय १३

श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंदीनानांपरीपालके ॥ स्वर्गापवर्गदेमातवांच्छितार्थ प्रदायिनी ॥१॥

शुकम्हणतीवासुकीनाग ॥ सर्वनागाधिपतीअव्यंग ॥ परमसिद्धीसीपावलासुभग ॥ जीअन्यासीदुष्कर ॥२॥

वरिष्टम्हणेकोणतेकाळीं ॥ वसुकीनागपरमबळी ॥ सिद्धिसीपावलाकोणते स्थळीं ॥ कायतपातेंआचरला ॥३॥

कोणाचेंकरिताझालापूजन ॥ त्यासीकायप्राप्तझालेंपूर्ण ॥ हेंमीऐकूंइच्छितोंजाण ॥ तरीसर्वहीकथनकरावें ॥४॥

शंकरम्हणेमुनीश्रेष्ठा ॥ सर्ववेदविदवरिष्ठा ॥ वासुकीनागाचीप्रतिष्ठा ॥ वाढलीदेवीप्रसादें ॥५॥

तेंचरित्रलोकपावन ॥ मीसांगतोंतूंकरीश्रवण ॥ एकदातोभोगिराजजाण ॥ सर्पसमुदायघेउनी ॥६॥

आलादेवीचेनिवासस्थानीं ॥ जीसर्वलोकचीनिजननी ॥ जीअंबात्र्यैलोक्यपावनी ॥ घ्यावयातिचेंदर्शन ॥७॥

मनस्वस्थकरोनीसहज ॥ अंबेसीसांगेदुःखबीज ॥ म्हणोनियांभोगीराज ॥ आलाउद्विग्रहोऊनी ॥८॥

कायदुःखझालेंत्यासी ॥ ऐसेंकल्पिसीलमानसी ॥ शंकरम्हणेतेंहीतुजसी ॥ सांगतोंऐकमुनीवर्या ॥९॥

रावणानुज अहिरावण ॥ जोपाताळवासीदुर्जन ॥ त्यानेंवाहनभूषण ॥ पराभवकेलावासुकीचा ॥१०॥

स्थानभ्रष्टकरोनीजाण ॥ घेतलेंछत्रसिंव्हासन ॥ त्याचेंवाहनभूषण ॥ सर्वहिरोनीघेतलें ॥११॥

त्युआदुःखनिंबहुसंतप्त ॥ येपरमभययुक्त ॥ हो उनिपातलात्वरित ॥ दक्षिणप्रदेशीदेवीच्या ॥१२॥

तपाआरंभिलेंकठीण ॥ स्वशरीराचेंशोषण ॥ श्रेष्ठवापिकाएकनिर्माण ॥ आपुलेंसन्निधकरोनियां ॥१३॥

जिचेंनिर्मळजीवन ॥ तेथेंबैसलाजाऊन ॥ त्रिवारप्राणायामकरुन ॥ देवीसुक्तजपतसे ॥१४॥

निराहारजितक्रोध ॥ जितप्राणजितेंद्रियशुद्ध ॥ मौनधरोनीप्रबुद्ध ॥ देवीपुजनकरितसे ॥१५॥

नऊदिवसपर्यंत ॥ पूजनकरितसेनेमस्त ॥ उपचारपुरवितीसमस्त ॥ महोरगसेवकसर्वदा ॥१६॥

नऊदिवसकरितांअनुष्ठान ॥ जगदंबाझालीसुप्रसन्न ॥ वासुकीसीमधुरवचन ॥ बोलतीझालीतेधवां ॥१७॥

हेवासुकीतुजमीप्रसन्न ॥ वरमागसीतोदेईन ॥ जेंआवडेंबोलवचन ॥ समाधानकरिनबोलोनी ॥१८॥

वासुकीम्हणेजगन्मते ॥ अहिरावण राक्षसेंउन्मतें ॥ बलात्कारेंसर्वधनातें ॥ हिरोनीनेलेंमाझीया ॥१९॥

नेलेंछत्रवाहनभृषण ॥ राज्यमाझेंघेतलेंजाण ॥ स्त्रियासर्वनेल्याधरोन ॥ हीनदीनमजकेलें ॥२०॥

होऊनीदुःखसंतप्त ॥ अंबेतुजमीशरणांगत ॥ कृपाकरुनीतारीत्वरीत ॥ दीनदयाळेजगदंबे ॥२१॥

शंकरम्हणेवरिष्ठाप्रती ॥ वासुकीची ऐकोनविनंति ॥ श्रीजंगदंबाकृपामृती ॥ वासुकीप्रतीवदतसे ॥२२॥

ऐकवासुकीमहामती ॥ आजपासोनीसहादिवसंतीं ॥ लक्ष्मणासहितश्रीरघुपती ॥ अहिरावणासीमारिल ॥२३॥

माझेप्रसादें श्रीरामराजा ॥ राक्षसासहितरावणानुजा ॥ वधिलसत्यवचनार्थमाझा ॥ तूंशोकर्व्यथभयसोडी ॥२४॥

येथूनजोकालपर्यंत ॥ आपुल्याघरासीजासीलत्वरित ॥ तितक्याकाळाचियाआंत ॥ श्रीरामवधिलत्या दुष्टा ॥२५॥

तुझेंराज्यतुजहोईलप्राप्त ॥ सर्वऐश्वर्यपूर्ववत ॥ मिळेलवापासुनिश्चित ॥ तूंजायगृहासी यथासुखें ॥२६॥

त्वंजेंनिर्मिलेयेथेंतीर्थ ॥ तुझ्यानामेलोकविख्यात ॥ परमपावनहोइलनिश्चित ॥ आधीव्याधीचेनाशक ॥२७॥

व्याधीग्रस्तजओनस्कोणी ॥ त्यांनीयानागतीर्थाजाऊनी ॥ स्थिरचित्तनिरा हारीहोऊनि ॥ स्नानकरावेंनऊदिवस ॥२८॥

तोनरहोईलव्यामुक्त ॥ ऐसावरदेउनीअंबनिश्चित ॥ श्रीजंगदंबापुन्हांबोलत ॥ वासुकीसीतेवेळीं ॥२९॥

ज्यास्त्रियाअसतीलदोषयुक्त ॥ चारीप्रकारच्या निश्चित ॥ एकानपत्यांवध्यानिश्चित ॥ काकवंध्यादुसरी ॥३०॥

एकवारप्रसुतहोऊन ॥ पुन्हांगर्भनधरीजाण ॥ हेंकाकवंध्येचेंलक्षण ॥ मृतप्रजातीतिसरी ॥३१॥

वारंवारहोयप्रसुत ॥ संतानजिचें मरूनीजात ॥ आतांचौथीपुत्रनहोयनिश्चित ॥ कन्याचहोतीजीलागीं ॥३२॥

ऐशास्त्रियाअसतीलदोषी ॥ त्यांनींशुक्लपक्षश्रावनमासीं ॥ रविवारयेईलज्यातिथीसी ॥ नगतीथींस्नानकरावें ॥३३॥

माध्यान्हकाळहोतांसहज ॥ वासुकीतुझेजेवंशज ॥ कद्रुसुतसर्पराज ॥ त्यासीपुजावेंसद्भावें ॥३४॥

नागप्रतिमासुवर्णाचा ॥ रजताथवांताब्याच्या ॥ अथवाकराव्यामृत्तिकेच्या ॥ यथाशक्तिकरोनी ॥३५॥

करावेंसप्तफनायुक्त ॥ अथवापंचफनान्वित ॥ नवसंख्याप्रतिष्ठित ॥ शुभपीठावरीस्थापाव्या ॥३६॥

रक्तव्स्त्ररक्तचंदन ॥ रत्‍नपुष्पेंकरविंपूजन ॥ ब्रीहीसंभवलाह्मावाहन ॥ अगरुधृपसमर्पावा ॥३७॥

सोळापदराचादोरक ॥ दोनवितीप्रमाणक ॥ सोळाग्रंथीदेऊननेटक ॥ हरिद्रासिंदूरलावनी ॥३८॥

नागाचेअग्रभागींठेवून ॥ नागासहितकरावेंपुजन ॥ धृपदीपसमर्पण ॥ करोनीनैवेद्यअर्पावा ॥३९॥

शर्करायुक्तपायस ॥ नानाभक्षभोज्यसुरस ॥ शुचिर्भुतहोउनीनिर्मिलेअशेष ॥ ऐसानैवेद्यसमार्पावा ॥४०॥

फलतांबूलदक्षणादेऊन ॥ करावेंमंगलनिरांजन ॥ प्रदक्षिणनमस्करकरून ॥ मस्तकींअंजलीकरुनियां ॥४१॥

काद्रवेयमहाबलवान ॥ त्यासीक्षमाकरावीम्हणावेंजाण ॥ वारंवारप्रार्थनाकरून ॥ नमस्कार करावा ॥४२॥

सर्पश्रेष्ठजेअतुर्बळी ॥ जेसचारकरितीधरणीतळीं ॥ त्यासनमस्कारवेळोवेळीं ॥ माझाअसोसाष्टांगें ॥४३॥

माझाअनपत्यकृतदोष ॥ नासोनीकरोतमजनिर्दोष ॥ यामंत्रेंप्रार्थुनविशेष ॥ नमस्कारकारावापुनःपुन्हां ॥४४॥

पूजाझालीयापरीपूर्ण ॥ मगनवसंखयब्राह्मण ॥ त्यासीद्यावेंमिष्टान्न भोजन ॥ परमाअदरेंकरोनी ॥४५॥

ब्राह्मणभोजनानंतर आपण ॥ अवशिष्टान्नाचेंकरावेंभोजन ॥ नियम उत्तमकरून ॥ स्वधर्मयुक्तअसावें ॥४६॥

ऐशाप्रकरेंजीनारी ॥ व्रतकरीलसुविचारी ॥ नवसंख्यापुत्रनिर्धारीं ॥ प्राप्तहोतीलतिजलागीं ॥४७॥

तीयालोकींविपुलसुखभोग ॥ भोगीलजेइतरादुर्लभसुभग ॥ पुनरावृत्तीरहितअव्यंग ॥ महत्पदासीपावेल ॥४८॥

जोकोणीफावलेकाळीं ॥ स्नानकरीलनागतीर्थजळीं ॥ तोनिष्पापहोउनीपन्नगस्थळी ॥ महत्पदवीसीपावेल ॥४९॥

यात्र्यैलोक्याभीतरीं ॥ असंख्यतीर्थेंआहेतबरीं ॥ परिनागतीर्थाचीसरी ॥ सोळावीहीनसेकोणा ॥५०॥

नागतीर्थजळेंकरुन ॥ माझीपुजाकरीलजाण ॥ त्याचेमनोरथमीपुरवीन ॥ निःसदेहनागनाथा ॥५१॥

तुंजायाअतांयेथुन ॥ रसातळानिर्भयहोउन ॥ तुझेंऐश्वर्यतुजलागुन ॥ मिळेलान्यथानव्हेची ॥५२॥

शंकरम्हणेवरिष्ठाप्रती ॥ तुजमीवर्णनकेल्यारीतीं ॥ वासुकीसीबोललीआदिशक्ति ॥ तुळजापापनाशिनी ॥५३॥

मगतोवासुकी पन्नगेश्वर ॥ देवीसीकरोनीनमस्कार ॥ कल्लोलतीर्थींस्नानसत्वर ॥ करोनीगेलारसातळा ॥५४॥

नागतीर्थाचामहिमा ॥ तुजकर्हिलविप्रोत्तमा ॥ आतांमातंगीचामहिमा ॥ सांगतोंऐकतुजलागीं ॥५५॥

अंबिकादेवीच्याईशान्यदेशीं ॥ योगिनीवृदपरिवारेंसीं ॥ राहिलीमांतगीनामजिसी ॥ तुळजादेवीच्या आज्ञेनें ॥५६॥

मातंगीच्यापश्चिमेसी ॥ मातंगीकुंडनामज्यासी ॥ योगिनीनेंखाणिलेंत्यासी ॥ जळपुर्णत्यांतअसे ॥५७॥

त्याकुंडामाजींस्नानजोनर ॥ कृष्णाष्टमीगुरुवार ॥ तसीचचतुर्दशीभौमवार ॥ प्रदोषकाळींकरोनियां ॥५८॥

शुचिनियमयुक्तउपोषित ॥ होऊनीजजगदंबेसीपुजीत ॥ तैसेंचमातंगीसी पुजित ॥ दीपोत्साहकरोनी ॥५९॥

त्यासीमातृलोकहोईलप्राप्त ॥ जोकाम्योगिनीवृदसेवित ॥ तेथेंराहोनिनिश्चित ॥ सुखापारभोगील ॥६०॥

आश्विनमासींनवरात्र ॥ होऊनशुचिर्भुतनर ॥ आपुलेंवैभवानुसार ॥ मातंगीसीपूजावें ॥६१॥

सुरामासबलिदान ॥ मातंगीसीदेऊनजाण ॥ दीनानाथालागुन ॥ भोजनद्यावेंपक्कान्नें ॥६२॥

नानाप्रकारचेंअन्न ॥ पायसमोदकगुडोदन ॥ अपूपटकतिलमिष्टान्न ॥ भोजनघालावेंभक्तिनें ॥६३॥

त्यासीयाजनींसौभाग्यहोईल ॥ इच्छिलेंफळपावेल ॥ ग्रह भूत व्याधीभय जाईल ॥ उत्पातारिष्टेंटळतील ॥६४॥

चोरव्याघ्रतक्षुभय ॥ नृपयक्षराक्षसमय ॥ संग्रामींआणिमार्गातभय ॥ होणारनाहींकदापि ॥६५॥

पांचदिवसपर्यंत ॥ जोमातंगीसीपुजित ॥ त्यासीइच्छिलें होईलप्राप्त ॥ इहपरलोकींसुखपावे ॥६६॥

होऊनियांमृतिमंत ॥ स्वप्नींदर्शनदेईलनिश्चित ॥ मातंगीपरतेदैवत ॥ नसेदुजेंत्रिभुवनी ॥६७॥

अल्पप्रयत्नेंभजतां ॥ संतुष्टहोतसेतत्वतां ॥ जीवासीमातंगींभजनापरता ॥ सुलभउपायनसेअन्य ॥६८॥

कलियुगींपापजनसमस्त ॥ अल्पवीर्याल्पसामर्थ्य ॥ अल्पभाग्याल्पसत्वयुक्त ॥ अल्पायुषीअल्पबुद्धी ॥६९॥

अल्पबलमनुष्यासी ॥ मांतगीसुसेव्यसर्वांसी ॥ बहुकायबोलूंमातंगीऐसी ॥ चराचरीविश्वांत ॥७०॥

मागेंझालीनाहींकोणी ॥ पुढेंही होणारनाहींजनी ॥ मांतगीपुजनेंकरोनी ॥ मनकामनापूर्णहोती ॥७१॥

तुजजगदंबेअनन्यशरण ॥ पांडुरंगजानार्दन ॥ पुढीलकथेचेंस्फुरण ॥ वर्णायामजदेई ॥७२॥

श्रोतीव्ह्यावेंसावधान ॥ पुढेंमातंगी चरित्रवर्णन ॥ सविस्तरहोईलपूर्ण ॥ ऐकातुम्हीआदरें ॥७३॥

इतिश्रीस्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुरजामहतम्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ नागतीर्थमातंगीवर्णननाम ॥ त्रयोदशोध्यायः ॥१३॥

श्रीजगंदंबार्पणमस्तु ॥ शुभभवतु ॥