Get it on Google Play
Download on the App Store

सम्यक स्मृती

सम्यक स्मृती हे सातवे सूत्र आहे. व्यर्थ ते विसरणे आणि सार्थ ते स्मरणात ठेवणे दैनंदिन जीवनात घडावयास हवे. पण उलटच घडते. वाईट गोष्टींच्या स्मृती पक्क्या होतात. कोणी आपल्याकरता काय केले हे लक्षात राहात नाही. उलट काय केले नाही तेवढे मात्र लक्षात राहते. दैनंदिन जीवनात हे दु:खाला कारणीभूत ठरते. आपल्या शरीरमनातील सुखदु:खादींचे साक्षित्वाने अवलोकन करीत त्यांचे स्वरूप समजावून घेणे, त्याबाबतीत मन सावध, जागृत व संतुलित असणे म्हणजे सम्यक स्मृती.