Get it on Google Play
Download on the App Store

करणीय सुत्त

शांती पदाची प्राप्ती हिच्छिणाऱ्या , कल्याण साधनात प्रविण मनुष्यांनी प्रथम योग्य, ॠजु आणि अत्यंतु ॠअजु बनावे, त्याची वाणी मधुर, मृदु आणि विनीत असावी

तो रंतोषी सहजासहजी जीवन चालवणारा आणि त्याची राहणी साधी असावी. तो इंद्रियाने शांत असावा. हुशार, प्रगल्भ आणि कुटुंबात अनासक्त असावा.

जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत (अशी मैत्रीभावना करावी)

जम असोत वा स्थावर, दीर्घ असोत वा महान मध्यम असोत वा ह्रस्व, लहान असोत वा मोठे, दृश्य असोत वा अदृश्य, दुर असोत वा जवळ, उत्पन्न झालेले असोत वा उत्पन्न न झालेले सर्व प्राणी सुखी असोत.

कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवा विरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत.

ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करावा.

मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढवावा.

उभे असता, बसले असता वा झोपले असता म्हणजे जोपर्यंत जागृत असेल, तोपर्यंत अशीच स्मृती ठेवावा, यालाच ब्रह्मविहार असे म्हणतात.

असाच मनुष्य कधी मिथ्यादृष्टीत न पडता, शीलवाण होऊन, विशुद्ध दर्शनाने युक्त होऊन, कामतृष्णेचा नाश करुन गर्भशय्येतुन मुक्त होतो.