Get it on Google Play
Download on the App Store

महामंगल सुत्त..

भगवान बुद्ध श्रावस्थी येथे अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करत असताना,, एक देवता रात्र संपता, संपता आपल्या तेजाने सर्व जेतवन प्रकाशित करीत भगवंताजवळ आली व भगवंताला वंदन करुन एका बाजुला उभी राहिली. आणी एक गाथा म्हटली..

हे भगवान! स्वतःचे कल्याण इच्छिणार्या पुष्कळ देव आणी मणुष्यांनी मंगलाचा विचार करुनही ते त्यांना गवसले नाही. तेव्हा उत्तम मंगल कोणते ते आपण सांगा

भगवान म्हणाले-

मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हेच उत्तम मंगल होय!!

अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे उत्तम मंगल होय!!

अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, श्ष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे, हेच उत्तम मंगल होय!!

आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे,हेच उत्तम मंगल होय!!

दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर-
सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणेहेच उत्तम मंगल होय!!

काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हेच उत्तम मंगल होय!!

गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर
धर्मश्रवण करणे, हेच उत्तम मंगल होय!!

क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे,सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक
चर्चा करणे,हेच उत्तम मंगल होय!!

तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे,आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी
निर्वाणाचा साक्षात्कार करणे हेच उत्तम मंगल होय!!

ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...

याप्रमाणे कार्य करुन जगात विजयी होऊन लोक कल्याणाचा साक्षात्कार करतात, हेच त्यांच्याकरीता उत्तम मंगल होय