Get it on Google Play
Download on the App Store

बौद्ध साहित्य

गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मय होय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्‌पिढ्या पुढे चालत राहिला. उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली.

एकूण भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमाध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते.

गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यांविषयी अनेक पुस्तके विविध भाषांत आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे:

पाली
    त्रिपिटक

मराठी

    भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म (लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    गौतम बुद्धाचे चरित्र (लेखक कृष्णराव अर्जुन केळूसकर, १८९८)
    खुद्दकपाठो (संपादक - ना.के. भागवत, १९३७)
    जातकसंग्रह (लेखक - ना.वि. तुंगार)
    जातकांतील निवडक गोष्टी (लेखक - चिं.वि. जोशी)
    तेरा भिक्षुणी रत्‍ने (ना.के. भागवत, १९२३)
    दीघनिकाय (लेखक - चितामण वैजनाथ राजवाडे, १९१८)
    धम्मचिकित्सा (लेखक राजाराम नारायण पाटकर, १९३२)
    धम्मपद (लेखक - कुंदर बलवंत दिवाण, १९४१)
    बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष (हेमा साने) : या पुस्तकाचे परीक्षण येथे आहे.
    बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (लेखक चिं.वि. जोशी, १९६३)
    बौद्ध संघाचा परिचय (लेखक - धर्मानंद कोसंबी, १९२६)
    बौद्ध-संस्कार पाठ (लेखक - वि.रा. रणपिसे, १९६१)
    भगवान गौतम बुद्ध (लेखक - साने गुरुजी, १९४४
    भगवान बुद्ध (लेखक - सरश्री)
    भगवान बुद्धासाठी (लेखक श.द. देव. १९४७)
    लघुपाठ (लेखक - धर्मानंद कोसंबी, १९१७)
    समाधिमार्ग (लेखक - धर्मानंद कोसंबी १९२५)
    सुत्तनिपात (पाली ग्रंथ व मराठी भाषांतर, मराठी भाषांतरकार - धर्मानंद कोसंबी, १९५५)

इंग्रजी
    दि बुद्ध ॲन्ड हिज धम्म (लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर)