Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ६ ते १०

पश्याऽऽदित्यान्वसून्रुद्रानश्चिनौ मरुतस्तथा ।

बहून्यद्दष्टपूर्वाणि पश्याऽऽश्चर्याणि भारत ॥६॥

विश्वरूपाची ह्या । उघडतां द्दष्टि । पसरती सृष्टि । आदित्यांच्या ॥२९८॥

मग मागुतीं ती । मिटोनि जातां च । सर्व हि त्या साच । लया जाती ॥२९९॥

देख मुखींचिया । तीव्र वाफेसवें । होतसे आघवें । ज्वालामय ॥३००॥

तया ज्वालेमाजीं । पावकादि मग । अष्टवसु -वर्ग । जन्म पावे ॥३०१॥

आणि क्रोधावेगें । जेव्हां एकत्रित । यावया पहात । भ्रू -लताग्रें ॥३०२॥

तेव्हां तेथें रुद्र - । गणांचा संभार । होतसे साचार । अवर्तार्ण ॥३०३॥

अश्विनीकुमार । होती असंख्यात । कैसे ओलाव्यांत । सौम्यतेच्या ॥३०४॥

आणि नानाविध । वायू कानांतून । पांडवा निर्माण । होती देख ॥३०५॥

ह्यापरी एकैक । स्वरूपाची लीला । सुर -सिद्धि -कुळा । जन्म देई ॥३०६॥

ऐसीं हीं विशाळ । स्वरूपें साचार । अर्जुना अपार । देख माझीं ॥३०७॥

जया स्वरूपांचें । कराया वर्णन । वेद ते हि जाण । असमर्थ ॥३०८॥

काळाचें आयुष्य । पडे थोकडें च । पहावया साच । स्वरूपें जीं ॥३०९॥

आणि सृष्टिकर्त्या । ब्रह्मदेवातें हि । सांपडे ना कांहीं । ठाव ज्यांचा ॥३१०॥

तीन हि देवांच्या । येती ना जीं कानीं । देख तीं नयनीं । स्वरूपें हीं ॥३११॥

आणि आश्चर्यांच्या । ऐश्वर्याचा भोग । घेईं येथें चांग । कौतुकें तूं ॥३१२॥

इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम ‍ ।

मम देहे गुडाकेश यच्चान्यद्‍द्रष्टुमिच्छसि ॥७॥

कल्पवृक्षाणतळीं । जैसें तृणांकुर । वाढावे अपार । धनंजया ॥३१३॥

विश्वरूपाचिया । रोम -मूळीं तैशा । वाढल्या ह्या कैशा । सृष्टि देख ॥३१४॥

वातें परमाणु । होतां खालींवर । दिसती अपार । कडोशांत ॥३१५॥

तैसीं ब्रह्मांडें हीं । करिती भ्रमण । सांध्यासांध्यातून । प्रत्यंगाच्या ॥३१६॥

येथ एक एक । देख अंग -प्रांतीं । विश्वाची संभूति । सविस्तर ॥३१७॥

आणि विश्वाच्या हि । पलीकडे कांहीं । वाटे जरी तें हि । देखावेंसें ॥३१८॥

तरी तयाची हि । तुज वाण नाहीं । देख माझ्या देहीं । आवडे तें ॥३१९॥

विश्वरूपधारी । ऐसा दयाघन । बोले जनार्दन । पार्थालागीं ॥३२०॥

तंव देखें किंवा । न देखें हें कांहीं । न सांगतां राही । स्तब्ध पार्थ ॥३२१॥

येथें कां हा ऐसा । राहिलासे स्तब्ध । म्हणोनि गोविंद । पाहे जेव्हां ॥३२२॥

तेव्हां दिसे लेणें । आर्तीचें लेवोन । राहिला अर्जुन । तैसा चि तो ॥३२३॥

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुपा ।

दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ‍ ॥८॥

मन मनीं म्हणे । पार्थाची उत्कंठा । नाहीं च सर्वथा । ओहटली ॥३२४॥

अजून हि नित्य - । सिद्धानंद -मार्ग । ह्यासी नाहीं चांग । सांपडला ॥३२५॥

विश्वरूप तरी । दाखविलें भलें । परी आकळलें । नाहीं ह्यासी ॥३२६॥

जाणोनि हें देव । श्रीकृष्ण हांसले । हांसोनि बोलिले । तयालागीं ॥३२७॥

विश्वरूप तरी । दाखविलें साच । परी देखसी च । ना तें पार्था ॥३२८॥

तंव तो चतुर । म्हणे नारायणा । सांगा कमीपणा । कोणासी हा ? ॥३२९॥

बगल्याकडोन । कैसें भगवंता । सेववूं पहातां । चंद्रामृत ? ॥३३०॥

देवा तुम्ही कैसा । पुसोनि आरसा । दावूं पहातसां । आंधळ्यासी ? ॥३३१॥

किंवा बहिर्‍यासी । कैसें रमाकांत । ऐकवूं पहातां । गोड गान ? ॥३३२॥

दर्दुरासी वायां । मकरंद -कण । खावया घालोन । काय लाभ ? ॥३३३॥

आतां रागेजावें । कैसें कोणावरी । पहावें अंतरीं । विचारून ? ॥३३४॥

जयालागीं शास्त्रें । बोलती साचार इंद्रियां गोचर । नव्हें ऐसें ॥३३५॥

आणि जें केवळ । ज्ञानद्दष्टीच्या च । भागा आलें साच । विश्वरूप ॥३३६॥

चर्मचक्षूं पुढें । ठेविलें तें तुम्हीं । मग देखावें मी । कैसें सांगा ? ॥३३७॥

परी नये बोलूं । तुमचें हें न्य़ून । सोसावें आपण । हें चि भलें ॥३३८॥

तंव देव म्हणे । बोलसी जें पार्था । मान्य तें सर्वथा । आम्हांलागीं ॥३३९॥

तुज विश्वरूप । दाखवाया येथ । जाहलों प्रवृत्त । जंव आम्हीं ॥३४०॥

तंव तें पहाया । दिव्य -ज्ञान -द्दष्टि । आधीं हवी होती । द्यावयासी ॥३४१॥

परी प्रेमरंगीं । बोलतां साचार । पडला विसर । मज त्याचा ॥३४२॥

धनंजया भूमि । चोखाळिल्याविण । काय तें पेरून । बीज तेथें ? ॥३४३॥

तरी आतां माझें । विश्वरूप साच । देखसी ऐसी च । द्दष्टी देऊं ॥३४४॥

आमुचा ऐश्वर्य - । योग पाहें मग । लाभतां ती चांग । दिव्य -द्दष्टि ॥३४५॥

ऐश्वर्ययोगाचें । घडतां दर्शन । अनुभव पूर्ण । घेईं त्याचा ॥३४६॥

वेदान्तासी वेद्य । सर्व -लोक -आद्य । जगाचें आराध्य - । दैवत जो ॥३४७॥

तेणें कृष्णनाथें । भक्त -प्रेमोल्हासें । सांगितलें ऐसें । पार्थालागीं ॥३४८॥

संजय उवाच ---

एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः ।

दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ‍ ॥९॥

संजय तो म्हणे । विस्मय हा फार । मज वारंवार । कौरवेशा ॥३४९॥

कीं ह्या त्रिलोकांत । दुजी लक्ष्मीहून । भाग्यवती कोण । असे काय ? ॥३५०॥

कींवा श्रुतिवीण । जगीं दुजें कोण वर्णावया खूण । असे पात्र ? ॥३५१॥

किंवा सेवकांत । शेषाहून थोर । नसे चि साचार । दुजा कोणी ॥३५२॥

देवाचिया सोसें । जैसें योगी -जन । तैसें दुजें कोण । शिणे नित्य ? ॥३५३॥

किंवा ऐसा कोण । गरुडासमान । घेई जो वाहून । स्वामीकाजीं ? ॥३५४॥

परी सर्व हि तें । ठेवोनि बाजूस । पांडवांचा दास । झाला देव ! ॥३५५॥

देखा तयांसी च । जन्मल्पासोन । लाभलें संपूर्ण । कृष्ण -प्रेम ॥३५६॥

स्त्रियेच्या आधीन । जैसा कामीजन । तैस पार्थाधीन । झाला देव ! ॥३५७॥

तैसा पढविला । पक्षी हि बोले ना । जैसा हा अर्जुना - । संगें बोले ॥३५८॥

पाळिला जो पशु । स्वयें क्रीडेसाठीं । राहे ना तो मुठी - । माजीं ऐसा ॥३५९॥

कळेना तो कैसा । भाग्याचा उत्कर्ष । लाभला पार्थास । आज येथें ॥३६०॥

पूर्ण परब्रह्म । भोगावया भली । भाग्यवती झाली । ह्याची द्दष्टि ॥३६१॥

अर्जुनाचे शब्द । देव कैसे झेली । पुरवितो आळी । घेई जी जी ॥३६२॥

पार्थ कोपे तरी । निमूट तो साहे । रुसे तरी आहे । बुझावीत ॥३६३॥

लागलें पार्थाचें । देवालागीं पिसें । नवल हें कैसें । देखें राजा ! ॥३६४॥

जन्मल्यापासोन । जे का जितेंद्रिय । ऐसे ऋषिवर्य । शुकादिक ॥३६५॥

ते हि श्रीहरीचे । होवोनियां भाट । वर्णिती अवीट । रासक्रीडा ॥३६६॥

नित्य समाधींत । भोगिती अक्षय । जयाचें ऐश्वर्य । योगीराज ॥३६७॥

तो हा पार्थाधीन । झाला कैसा आज । नवल हें मज । वाटतसे ॥३६८॥

परी नवल हें । नको वाटावया । मज येथें राया । कौरवेशा ॥३६९॥

स्वयें कृष्णनाथें । जया स्वीकारावें । तथें ऐसें व्हावें । भाग्यवंत ॥३७०॥

म्हणोनियां बोले । देवेश तो पार्था । तुज देऊं आतां । दिव्य -द्दष्टि ॥३७१॥

जेणें विश्वरूप । देखावया चांग । होसील तूं मग । समर्थ कीं ॥३७२॥

वासुदेवाचिया । मुखांतूनि साच । ऐसीं निघतां च । अक्षरें हीं ॥३७३॥

पार्थ -ह्रदयांचा । अविद्या -अंधार । लोपला साचार । एकाएकीं ॥३७४॥

तेणें विश्वनाथें । ह्यापरी । आपुलें । ऐश्वर्य दाविलें । पार्थालागीं ॥३७५॥

दिव्य विश्वरूप । हा महा -सागर । सर्व अवतार । लाटा त्याच्या ॥३७६॥

विश्वरूप -सूर्या -। मुळें चि केवळ । जग -मृग -जळ । भासतसे ॥३७७॥

अनादि ज्या नीट । भूमिकेवरतीं । चराचराकृति । उमटतें ॥३७८॥

तें चि विश्चरूप । आपुल्या ठिकाणीं । दावी चक्र -पाणि । पांडवासी ॥३७९॥

मागें बालपणीं । देव हा श्रीकृष्ण । मृत्तिका -भक्षण । करी जेव्हां ॥३८०॥

यशोदामातेनें । तेव्हां रागेजोन । सांगतां वदन । उघडाया ॥३८१॥

झाडा द्यावयाचें । करोनि निमित्त । तेणें भीतभीत । तिजलागीं ॥३८२॥

निज -मुखामाजीं । सावकाशपनें । चौदा हि भुवनें । दावियेलीं ॥३८३॥

किंवा मधु -वनीं । ध्रुवाचिया गाला । शंखें स्पर्श केला । नारायणें ॥३८४॥

परी सर्व हि तें । ठेवोनि बाजूस । पांडवांचा दास । झाला देव ! ॥३५५॥

देखा तयांसी च । जन्मल्यापासोन । लाभलें संपूर्ण । कृष्ण -प्रेम ॥३५६॥

स्त्रियेच्या आधीन । जैसा कामीजन । तैसा पार्थाधीन । झाला देव ! । ॥३५७॥

तैसा पढविला । पक्षी हि बोले ना । जैसा हा अर्जुना - । संगे बोले ॥३५८॥

पाळिला जो पशु । स्वयें क्रीडेसाठीं । राहे ना तो मुठी - । माजीं ऐसा ॥३५९॥

कळेना तो कैसा । भाग्याच्या उत्कर्ष । लाभला पार्थास । आज येथें ॥३६०॥

पूर्ण परब्रह्म । भोगावया भली । भाग्यवती झाली । ह्याची द्दष्टि ॥३६१॥

अर्जुनाचे शब्द । देव कैसे झेली । पुरवितो आळी । घेई जी जी ॥३६२॥

पार्थ कोपे तरी । निमूट तो साहे । रुसे तरी आहे । बुझावीत ॥३६३॥

लागले पार्थाचें । देवालागीं पिसें । नवल हें कैसें । देखें राजा ! ॥३६४॥

जन्मल्यापासोन । जे का जितेंद्रिय । ऐसे ऋषिवर्य । शुकादिक ॥३६५॥

ते हि श्रीहरीचे । होवोनियां भाट । वर्णिती । रासक्रीडा ॥३६६॥

नित्य समाधींत । भोगितो अक्षय । जयाचें ऐश्वर्य । योगीराज ॥३६७॥

तो हा पार्थाधीन । झाला कैसा आज । नवल हें मज । वाटतसे ॥३६८॥

परी नवल हें । नको वाटावया । मज येथें राया । कौरवेशा ॥३६९॥

स्वयें कृष्णनाथें । जया स्वीकारावें । तयें ऐसें व्हावें । भाग्यवंत ॥३७०॥

म्हणोनियां बोले । देवेश तो पार्था । तुज देऊं आतां । दिव्य -द्दष्टि ॥३७१॥

जेणें विश्वरूप । देखावया चांग । होसील तूं मग । समर्थ कीं ॥३७२॥

वासुदेवाचिया । मुखांतूनि साच । ऐसीं निघतां च । अक्षरें हीं ॥३७३॥

पार्थ -ह्रदयींचा । अविद्या -अंधार । लोपला साचार । एकाएकीं ॥३७४॥

तेणें विश्वनाथें । ह्यापरी आपुलें । ऐश्वर्य दाविलें । पार्थालागीं ॥३७५॥

दिव्य विश्वरूप । हा महा -सागर । सर्व अवतार । लाटा त्याच्या ॥३७६॥

विश्वरूप -सूर्या - । मुळें चि केवळ । जग -मृग -जळ । भासतसे ॥३७७॥

अनादि ज्या नीट । भूमिकेवरतीं । चराचराकृति । उमटते ॥३७८॥

तॆं चि विश्वरूप । आपुल्या ठिकाणीं । दावी चक्र -पाणि । पांडवासी ॥३७९॥

मागें बाळपणीं । देव हा श्रीकृष्ण । मृत्तिका -भक्षण । करी जेव्हां ॥३८०॥

यशोदामातेनें । तेव्हां रागेजोन । सांगतां वदन । उघडाया ॥३८१॥

झाडा द्यावयाचें । करोनि निमित्त । तेणें भीतभीत । तिजलागीं ॥३८२॥

निज -मुखामाजीं । सावकाशपणें । चौदा हि भुवनें । दावियेलीं ॥३८३॥

किंवा मधु -वनीं । धुवाचिया गाला । शंखें स्पर्श केला । नारायणें ॥३८४॥

तों चि वेदांची हि । खुंटे जेथें मति । ऐसी दिव्य स्तुति । करूं लागे ॥३८५॥

तैसा अनुग्रह । भगवंतें केला । तेणें पार्थ झाला । प्रज्ञावंत ॥३८६॥

आतां पाहूं जातां । मायेचा आभास । दिसेना तयास । कोठें हि तो ॥३८७॥

एकाएकीं विश्व - । रूपाचें तें तेज । सर्वत्र सहज । प्रकटलें ॥३८८॥

तिये वेळीं मग । चमत्कारमय । आघावें चि होय । पार्थालागीं ॥३८९॥

तयाचें तों चित्त । जाहलें तटस्थ । बुडोनि गर्दींत । विस्मयाच्या ॥३९०॥

जैसा एकटा च । ब्रह्मांडोदकांत । राहिला पोहत । मांर्कडेय ॥३९१॥

तैसा लोळतसे । पार्थ तेथें तया । विश्वरूपाचिया । कौतुकांत ॥३९२॥

म्हणे येथें होतें । केवढें गगन । नेलें तें हिरोन । कोणें कोठें ? ॥३९३॥

स्थावर -जंगम । सर्व गेलें कोठें । पंच -महा -भूतें । काय झालीं ? ॥३९४॥

हारपले सर्व । दिशांचे हि ठाव । नेणों अध -ऊर्ध्व । गेले कोठें ? ॥३९५॥

जाग येतां स्वप्न । मावळे साचार । तैसे लोकाकार । हारपले ॥३९६॥

चंद्रासवें जैसें । लोपे तारांगण । सूर्य़नारायण । प्रकाशतां ॥३९७॥

तैसी प्रपंचाची । रचना संपूर्ण । टाकिली गिळून । विश्वरूपें ॥३९८॥

तेव्हां मनपण । मना आठवेना । बुद्धि हि आपणा । विसरली ॥३९९॥

इंद्रियांच्या वृत्तइ । वळोनि माघारीं । सकळ अंतरीं । सांठवल्या ॥४००॥

आणि ताटस्थ्यासी । ताटस्थ्य पडलें । टकासी लागलें । टक तेव्हां ॥४०१॥

जणूं मोहनास्त्र । पडोनि साचार । सर्व हि विचार । स्तब्ध झाले ॥४०२॥

ह्यापरी विस्मित । होवोनि कौतुकें । जंव पुढां देखे । चतुर्भुज ॥४०३॥

तंव तें चि दिसे । नानारूप झालें । मांडोनिया ठेलें । चोहींकडे ॥४०४॥

वर्षाकाळीं जैसी । पर्जन्याची वृष्टि । सकळ हि सृष्टि । व्यापीतसे ॥४०५॥

किंवा कल्पांतींचें । तेज तें चौफेर । जैसें अनिवार । वाढतसे ॥४०६॥

आपणावांचोन । तैसें दुजें कांहीं । उरूं दिलें नाहीं । भगवंतें ॥४०७॥

प्रथम तो पार्थ । पावे समाधान । स्व -स्वरूपीं लीन । होवोनियां ॥४०८॥

मग निज -नेत्र । उघडोनि पाहे । तंव देखताहे । विश्वरूप ॥४०९॥

ह्या चि दाहीं डोळां । पहावें सकळ । अदूभुत विशाळ । विश्वरूप ॥४१०॥

निज -भक्ताचें हें । थोर मनोगत । पुरवी श्रीकांत । ऐशा रीती ॥४११॥

अनेकवक्त्रनयनमनेकाद्‍भुतदर्शनम् ‍ ।

अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ‍ ॥१०॥

तया विश्वरूपीं । मग पंडु -सुत । आननें बहुत । देखतसे ॥४१२॥

जणूं रम्यतेचीं । राजमंदिरें च । तैसीं मुखें साच । श्रीहरीचीं ॥४१३॥

लावण्य -श्रियेचीं । ना तरी तीं साच । जणूं भांडारें च । प्रकटलीं ॥४१४॥

किंवा आनंदाचीं । वनें भरा आलीं । राज्य -प्राप्ति झाली । सौन्दर्यासी ॥४१५॥

तैसीं मनोहर । वदनें सुंदर । देखिलीं अपार । धनंजयें ॥४१६॥

तेविं आणिक हि । देखिलीं अनेक । मुखें भयानक । स्वभावें जीं ॥४१७॥

प्रळय -रात्रीचीं । सैन्यें उठावलीं । किंवा मुखें झालीं । मृत्यूसी च ॥४१८॥

जणूं भय -दुर्ग । रचिले प्रचंड । उघडलें कुंड । काळाग्नीचें ॥४१९॥

तैसीं अत्यद्धुत । आणि भयंकर । देखिलीं अघोर । मुखें तेणें ॥४२०॥

तेविं असामान्य । अलंकारयुक्त । देखिलीं बहुत । शांत सौम्य ॥४२१॥

ज्ञान - द्दष्टीनें हि । पाहूं जातां नीट । लागे ना शेवट । मुखांचा त्या ॥४२२॥

म्हणोनियां मग । जंव तो अर्जुन । कौतुकें लोचन । पाहूं लागे ॥४२३॥

विविध वर्णांचीं । तंव नित्य नवीं । जणूं विकसावीं । पद्म - वनें ॥४२४॥

किंवा आदित्यांच्या । शोभिवंत पंक्ति । तैसी नेत्र - कांति । दिसे तया ॥४२५॥

चमकावी जैसी । प्रळय - विद्युत । काळ्याकुट्ट दाट । मेघांमाजीं ॥४२६॥

तैसी लखलखीत । अग्निवर्ण द्दष्टि । दिसे तळवटीं । भुवयांच्या ॥४२७॥

ऐसें एकएक । अद्भुत आश्चवर्ण द्दष्टि । दिसे तळवटीं । भुवयांच्या ॥४२७॥

तंव दर्शनें तीं । देखे नानाविध । एका चि अगाध । विश्व - रूपीं ॥४२९॥

कोठें तो मुकुट । कोणीकडे बाहु । म्हणे आतां पाहूं । पाय ते हि ॥४३०॥

दर्शनाची इच्छा । ऐसी वाढवीत । जाय पंडुसुत । आवडीनें ॥४३१॥

काय मनोरथ । होतील ते व्यर्थ । तया भाग्यवंत । अर्जुनाचे ॥४३२॥

काय वायबाण । असतील राया । महादेवाचिया । भात्यामाजीं ॥४३३॥

किंवा काय मिथ्या । अक्षरांचे सांचे । ब्रह्मयाचिया वाचे - । माजीं होती ॥४३४॥

म्हणोनि तो पार्थ । देखतसे तेथ । संपूर्ण साद्यन्त । विश्वरूप ॥४३५॥

नाकळे वेदांसी । ज्याचा अंत पार । विश्वरूप थोर । ऐसें जें का ॥४३६॥

तयाचें सर्वांग । तेथें एके वेळे । निरखिती डोळे । अर्जुनाचे ॥४३७॥

चरणापासोन । मुकुटापर्यंत । थोरवी पहात । रूपाची त्या ॥४३८॥

जें कां विश्वरूप । दिसे शोभिवंत । रत्नीं अलंकृत । नानाविध ॥४३९॥

होवोनि साकार । परब्रह्में तेणें । लेइलीं भूषणें । स्वरूपाचीं ॥४४०॥

तया भूषणांचें । कराया वर्णन । मज उपमान । सांपडेना ॥४४१॥

जेणें चंद्रादित्य - । मंडळासी दीप्ती । ऐसी दिव्य कांति । तेजाची ज्या ॥४४२॥

महा - तेजाचें हि । होय जें जिव्हार । प्रकटे साचार । विश्व जेणें ॥४४३॥

ऐसा भव्य दिव्य । तेजाचा शृंगार । जो का अगोचर । बुद्धिलागीं ॥४४४॥

स्वयें चि तो तेथें । करोनि धारण । नटलें निर्गुण । परब्रह्म ॥४४५॥

विश्वरूप ऐसें । येई प्रत्ययास । लाभतां पार्थास । दिव्य - द्दष्टि ॥४४६॥

मग तो सुधीर । सरळ सुंदर । पाहूं जाई कर । तंव तेथें ॥४४७॥

काळाग्नीच्या ज्वाळा । टाकिती छेदून । ऐसीं शस्त्रें तीक्ष्ण । झळाळती ॥४४८॥

तया किरणांच्या । अति तीक्ष्णपणें । उडती फुटाणे । नक्षत्रांचे ॥४४९॥

देखोनि तें तेज । अग्नि भयभीत । म्हणे सागरांत । लपूं आतां ॥४५०॥

आल्या उसळोन । लाटा घनदाट । जणूं काळकूट । विषाच्या त्या ॥४५१॥

किंवा कल्पांतींच्या । विजांचें गहन । यावें उगवोन । रान जैसें ॥४५२॥

तैसे आयुधांनीं । सज्ज असंख्यात । देखतसे हात । पार्थ तेथें ॥४५३॥