Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शिक्षणाचा बाजार

      ज प्रत्येकाला वाटतं मी शिकावं मोठं व्हावं जीवनात मोठ्या पदावर असावं आणि त्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतं.शाळा,महाविद्यालये यातून ज्ञान तर मिळतेच आणि जीवनाला आकारही येतो.पण आजकालची परिस्तिथी काहीशी वेगळीच झालेली आहे.

     प्रत्येक पालकांना वाटत आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावं आणि त्याने यशस्वी व्हावं म्हणून पालक आपल्या मुलाला शाळेतील शिक्षणावर अविश्वास दाखवून खासगी शिकवणीला पाठवतात.पैसे देऊन शिकवणी घेतात.याची खरंच गरज आहे असं वाटतं का हो ? नाही ना मग ? का आपण शाळेतील शिक्षणावर विश्वास दाखवत नाही न खासगी शिकवणीला प्राधान्य देतो ? खासगी शिकवणी लावलेला मुलगा म्हणजे हुशार असतो आणि जो शाळॆतल शिक्षण घेतो तो हुशार नसतो का ? चांगलं शिक्षण पाहिजे असेल,परीक्षेत जास्त गुण मिळवायचे असेल,तर शिकवणी लावायलाच लागते असा पालक आणि विद्यार्थ्याचा गोड गैरसमज झालेला आहे.शाळेत असं शिक्षण मिळणं बंद झालं आहे का जे कि खासगी शिकवणीला लोक प्राधान्य देऊ लागतायं.
         खासगी शिकवणीवाले आमच्याकडे १००% निकाल दिला जातो,आमच्या कडे अमुक सोय आहे तमुक सोय आहे अशी जाहिरात करतात आणि मग आव्हा च्या सव्हा शुल्क आकारतात.शिकवणी लावून मुलगा हुशार होतो असं लोकांना पटवून देतात.म्हणून पालक आपल्या मुलाला शिकवणीला पाठवतात. शिकवणी फी सक्तीने भरावी आणि नाही भरल्यास शिकवणीला बसू देणार नाही असे नियम या शिकवण्या वाल्यानी लावलेले आहेत.प्रत्येक जण पैश्यावाला नसतो ना यांची एवढी फी भरायला.  काही शेतकऱ्यांची सुद्धा मुलं शिकतात त्यांनी एवढी फी एकदम कशी भरायची याचा विचार केलाय का कोणी ? छोट्या मोठ्या किती तरी शिकवण्या आज बघायला मिळतात प्रत्येक शिकवणी मध्ये एक स्पर्धा लागलेली आहे स्वतः ची शिकवणी चांगली कशी हे दाखवण्याची शिकवणी हा व्यापार आहे आणि याकडे लोकांनी तसेच बघावे.
          आधीच हुशार असलेल्या मुलांना शिकवून त्यांच्या निकालावर स्वतःच्या शिकवणीची जाहिरात करतात.मुळात ती मुलं यांच्या शिकवणीशिवाय तेवढे गुण घेऊ शकतात.अहो जे हुशार नाहीत अभ्यासात कमी आहेत त्यांना शिकवून त्यांच्या निकालावर जाहिरात करा.१००% गुण मिळालेत त्यांचा सत्कार तर होतोच पण कमी मार्क पडले त्यांना का प्रोत्साहित नाही करत त्यांचा पण सत्कार करा फोटो द्या..  का कमी मार्क वाल्यांचा फोटो दिल्यास लोक तुमची शिकवणी लावत नाहीत का ? माझा शिकवणीला विरोध नाही पण या गोष्टीचा थोडा विचार केला जावा एवढंच. पालकांना आणि विद्यार्थ्याना विनंती आहे कोणत्याहि भुलथापाला बळी न पडत शाळेतील शिक्षणावर विश्वास कायम ठेवा कारण शाळा आपल्याला खूप काही शिकवते. शिकवणी लावणं गरजेचं आहे असं मनातून काढून टाका.आणि याच सगळ्यामुळे वाटत शिक्षणाचा बाजारझालाय कि काय ?

✍️शिवराज जाधव पाटील