Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

परिस्तिथीतून शिक्षण

   शिक्षणाचा हक्क प्रत्येकालाच आहे आणि आज प्रत्येकजण शिकत आहे.आजकालच्या परिस्तिथीमध्ये पैसा असेल तर चांगलं शिक्षण आहे असचं झालं आहे. आणि प्रत्तेकाजवळ पैसा असतोच असं नाही,काही लोक असे आहे त्यांची परिस्तिथी बेताची आहे.पैसा आहे तर ज्ञान नाही आणि ज्ञान आहे तर पैसा नाही. आर्थिक परिस्तिथी ती चांगली नाही म्हणून काही ज्ञान असलेली मुलं सुद्धा शिक्षण सोडून कामाला लागलेली आहेत.काही लोक असे पण आहेत जे परिस्तिथी ती बिकट असून सुद्धा मोठ्या जिद्दीने शिक्षण शिकत असतात न हे लोक परिस्तिथीतून शिक्षण घेतात आणि या लोकांमध्ये काही तरी करून दाखवण्याची धमक दिसून येते न हेच लोक जीवनात मोठं यश प्राप्त करू शकतात.
            पैसा,सगळ्या सुख सुविधा,आर्थिक परिस्तिथी भक्कम असलेली काही मुलं बहुदा शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात त्यांना कशाची जाणीवच नसते,नाकाही करण्याची इच्छा. ज्यांना परिस्थितीची जाणीव असते ना तेच लोक यशस्वी होतात हे नक्की.म्हणून सतत प्रयत्न करावे मिळेल तिथे ज्ञान घ्यावे परिथिती खराब आहे म्हणून शिक्षण सोडून देण्यापेक्षा परिस्तिथी बदलण्यासाठी शिक्षण शिकून मोठं व्हावं
           परिथितीला दोष देत बसू नका,खचू नका तर परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीने लढायला शिका यश तुमची वाट बघत आहे.

✍️शिवराज जाधव पाटील