Get it on Google Play
Download on the App Store

आजकालची तरुणपिढी

        देशाचं उद्याच उज्वल भविष्य हे या तरुण पिढीवर अवलंबून आहे असं म्हणतात.देशाला पुढे घेऊन जाणारी हि तरुण पिढी माहिती ,विज्ञान,तंत्रज्ञाना यांच्या जोरावर देशाला पुढे घेऊन जाणार.पण हे सगळं खरं आहे का हो? खरंच अस वाटत का आजकालच्या तरुणांकडे पाहून ? या तरुण पिढीकडून ठेवलेलीअपेक्षा बरोबर आहे कि चूक ? नाही म्हणजे आजकालचे तरुण पहिले तर मोबाईलमध्ये वेडे ,काही प्रेमात आपलं आयुष्य वाया घालवणारे, काही जण दादागिरी , भाईगिरी करनारे , नको त्या व्यसनामध्ये गुरफटलेली हि अशी आजकालची तरुणपिढी देश पुढे नेईल का बरं ? शैक्षणिक काळामध्ये काही तरुण अमुक मंडळाचे अध्यक्ष तमूक संघटनेचे अध्यक्ष यातच अडकलेले आहेत.
       हल्ली असे काही तरुण आपल्याला दिसतात केस रंगवलेले , कटिंग काही तरीच , गळ्यात साखळ्या , हातावर नाव काढलेली , तोंडात मावा , शर्ट पॅन्ट  जगावेगळी घातलेली यांना नेमक दाखवायच तरी काय असता कोणास ठाऊक शिक्षण सोडून देऊन हे सगळे उद्योग करून काय मिळणार आहे बर आज कोण त्यांना बघतं. आणि हद्द म्हणजे सुशिक्षित मुली त्यांच्या सोबत फिरतात. बघून हसू येत आणि वाईट हि वाटत असो
       काही जण असेही आहेत जे खरोखरच यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र झटत असतात. आणि हि ती तरुणपिढी आहे जी देशाला विकसनशील कडून विकसित कडे घेऊन जाईल हे नक्की . योग्य त्या मार्गाला लागून अभ्यास करून देशाला पुढे घेऊन चला

✍️शिवराज जाधव पाटील
आणि नको त्या गोष्टीकडे मोहू होऊ नका.