Get it on Google Play
Download on the App Store

१९७१ चे भारत पाक युद्घ

१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.