Get it on Google Play
Download on the App Store

आयुष्य

- सौरभ धनवडे

आयुष्य,नेमकं असत तरी काय हे आयुष्य ? मरणाच्या दिशेने वाटचाल करणारा निरंतर प्रवास म्हणजे आयुष्य.जन्माला आल्या आल्या आयुष्य नावाच्या बसचा प्रवास सुरु होतो आणि संपतो तो शेवटच्या स्टॉपवर.कधी कधी भरपुर अडचणींचा सामना या प्रवासात करावा लागतो,ईतक्या अडचणी आल्या म्हणून प्रवास थांबवायचा नसतो तर त्याला काहीतरी पर्याय काढुन अविरत सुरू ठेवायचा असतो.

रस्त्यावरच्या प्रत्येक स्टॉपवर भरपुर सहप्रवासी भेटतात त्यातले काही शेवटच्या स्टॉपपर्यंतचे सोबती असतात तर काही अर्ध्यातच सोडुन जातात,काहीजण त्यांच्या आठवणी मागे ठेवुन जातात तर काहीजण पुन्हा अनोळखी होण्यासाठीच भेटलेले असतात.

कधी कधी हा प्रवास खुप रटाळवाणा वाटतो,त्यावेळेस मनाला वाटतं की संपावा लवकरच हा प्रवास,तर कधी हाच प्रवास अश्या एका वळणावर येवुन पोहोचतो की तेव्हा मनाला वाटते की कधी संपुच नये हा प्रवास,मग स्टॉप जवळ येण्याची भिती वाटू लागते,पण स्टॉपतर एकेदिवशी येणारच असतो हे एक सत्यच.......

वार्यावर डौलणार ते झाडाचं हिरवगारं पान प्रारब्ध बदलला की झाडावरून गळुन पडुन कधी मातीत विरून जातं त्यादरम्यानचा त्याचा प्रवास म्हणजेच आयुष्य..............!