Get it on Google Play
Download on the App Store

व्यथा

- सौरभ धनवडे

मरणयातना सोसल्या होत्या त्या बिचारीने जेव्हा तु गर्भाशयात होतास.

कधी कधी तर  तिला ईतक्या वेदना व्हायच्या  पण तिच्यासाठी  त्या वेदना काहीच नव्हत्या ऊलट तिला आनंद व्हायचा.

ईवलासा होतास रात्रीचा रडून रडून थैमान घालायचास तेव्हा तीच तुझ्याबरोबर रात्ररात्रभर जागायची.

तुला शांत करण्यासाठी कितीतरी नवीन अंगाई गीतांना जन्म दिला असेल तिने.

तुला आठवत नसेल पण एकदा तु खुप आजारी पडलेलास ४ दिवस तु दवाखान्यात होतास तर त्या ३ रात्री तीने डोळ्याची पापणी बंद न करता जागून काढलेल्या.

कसा कावराबावरा व्हायचास तेव्हा जेव्हा ती तुझ्या डोळ्यांसमोरून काहीक्षणांसाठी गायब व्हायची.

शाळेत ७ व्या ईयत्तेत असताना माझी आई या विषयावर भाषण देऊन पहिला क्रमांक मिळवलेलास ना रे तु.

बाबा गेल्यावर तर तीने तुला तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपलं होतं.

आज तु शिकुन मोठा अधिकारी झालायसं.

सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा तीने तुझं लग्न तुझ्या आवडत्या मुलीबरोबर लावुन दिले.

काय चुकलं तिचं नेमकं  ???

का नकोशी वाटत होती ती तुला अन् तुझ्या बायकोला घरात.

सासरच्या लोकांच्यासमोर तिला तुच्छ लेखण्याईतपत तुझी कशी काय मजल गेली.

कालपरवाच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तु आईला काहीपण कसा काय बोलु लागलास.

ज्या आईच्या घरात तु रहात होतास तिलाच तु वृद्धाश्रमात रहाण्याची गोष्ट सांगु लागलास.

बघ ती वेडी तुझ्या सुखासाठी एका पायावर तयार झाली वृद्धाश्रमात जाण्यासाठी.

शेवटी तु तिला सोडूनच आलास वृद्धाश्रमात जिने तुला हे जग दाखवण्यासाठी मरणयातना सोसल्या होत्या तिच्या उपकारांची तु परतफेड केलीस तिला वृद्धाश्रम दाखवुन.

तिला सोडुन मागे येताना हसत होतास ना तु जिंकल्यासारख पण तुझ्या माहितीसाठी सांगतो ती तुझी नाही तर एका राक्षसाची जीत होती,माणुस म्हणुन तू कधीच सपशेल हरलायसं.

आज पुन्हा निघालायस ना तु वाढत्या वृद्धाश्रमांमागची कारणे ह्या विषयावर व्याख्यान द्यायला...वाह..दाद द्यायला हवी तुझ्यातल्या एका कलाकाराची किती अप्रतिम भुमिका निभावतोस.

पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव 'पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त' तु पण एक दिवस वयोवृद्ध होणारेस.......!