Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

रामचंद्राचीं आरती - जय जय श्रीरामचंद्रा भक्तव...

जय जय श्रीरामचंद्रा भक्तवत्सला ॥
पंचारति करितो तुज दावी पाउला ॥ धृ. ॥
अयोध्यपुर दट्टण शरयूच्या तीरी ॥
अवतरसि रवि कुळी कौसल्येमंदिरीं ॥
नगरांतील नारि सकल येति झडकरी ॥
ओंवाळीति प्रेमभरे आरती तुला ॥ जय. ॥ १ ॥
सुरवर मग पुष्पवृष्टी करुनि डोलती ॥
अप्सरादि गान अति मधुर बोलती ॥
दुष्ट दैत्य धाके बहु चित्ति पोळती ॥
त्रिभुवनांत भक्तजनां हर्ष जाहला ॥जय जय. ॥ २ ॥
पितृवचन मानुनियां विचरसी वनी ॥
दशशिर कपटे हरि जनकनंदिनी ॥
वानरदल अतितुंबळ निघसि येउनि ॥
सागरांत नामबळे सेतु बांधिला ॥ जय जय. ॥ ३ ॥
रावणादि दुष्ट दैत्य वधिसी त्यांजला ॥
विबुध मुक्त करुनि भरत राज्यिं स्थापिला ॥
जानकीसह निजगजरे येसि निजस्थळा ॥
अभयवरे विठ्ठलसुत रक्षिं आपुला ॥जय जय. ॥ ४ ॥

रामचंद्राचीं आरती

भगवान दादा
Chapters
रामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं । सुज...
आरती रामाची - जयदेव जयदेव जयजय श्रीरामा...
आरती रामाची - जयजयाजी रामराया करि कृपेच...
रामचंद्राचीं आरती - दशरथराजकुमारा धृतमुक्ताहा...
रामचंद्राचीं आरती - अवतरला रघुपती जे । आनंदली...
रामचंद्राचीं आरती - सर्वही वस्तु त्वद्रुप मज ...
रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय आत्माराम...
रामचंद्राचीं आरती - स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे...
रामचंद्राचीं आरती - काय करुं गे माय आतां कवणा...
रामचंद्राचीं आरती - श्यामसुंदर रामाचे चरणकमळी...
रामचंद्राचीं आरती - नयना देखत जन हे विलयातें ...
रामचंद्राचीं आरती - दशरथ राजकुमारा धृत मुक्ता...
रामचंद्राचीं आरती - कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ...
रामचंद्राचीं आरती - साफल्य निजवल्या कौसल्या म...
रामचंद्राचीं आरती - त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग...
रामचंद्राचीं आरती - अयोध्या पुरपट्टन शरयूचे त...
रामचंद्राचीं आरती - ऎकावी कथा कानीं राघवाची ,...
रामचंद्राचीं आरती - श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप...
रामचंद्राचीं आरती - स्वात्मसुखामृत सागर जय सद...
रामचंद्राचीं आरती - राक्षसंभारे पृथ्वी बहुभार...
रामचंद्राचीं आरती - तव ध्यानें माझें मन मोहित...
रामचंद्राचीं आरती - आजि रघुपति तव चरणीं करितो...
रामचंद्राचीं आरती - बंबाळ कर्पुराचे । दीप रत्...
रामचंद्राचीं आरती - रत्नांची कुंडलें माला सुव...
रामचंद्राचीं आरती - विडा घ्याहो रघुवीरा । राम...
रामचंद्राचीं आरती - आरती करितों राघवचरणीं । ...
रामचंद्राचीं आरती - परमात्मा श्रीरामा महामाया...
रामचंद्राचीं आरती - विडा घ्याहो रामराया । महा...
रामचंद्राचीं आरती - काय करुं माय आतां कवणा ओव...
रामचंद्राचीं आरती - दशरथे रामचंद्रा कौसल्या प...
रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय मंगलधामा...
रामचंद्राचीं आरती - जय जय श्रीरामचंद्रा भक्तव...
रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय चिन्मय र...
श्रीरामाची आरती - जयजय रघुनंदन प्रभु, दिन द...