Get it on Google Play
Download on the App Store

श्रीकृष्णाची आरती - कोण शरण गेले विधि त्रिपुर...

कोण शरण गेले विधि त्रिपुरहरणा ।

गोरुपा भूदेवांसह दु:खोद्धरणा क्षीराब्धिस्थें कोणीं येऊनियां करुणा ॥

नाभी नाभी गर्जुनी केले अवतरणा ॥ १ ॥

जय देव जय देव जय मेघश्यामा ।

ब्रह्मचारी म्हणविसी भोगुनियां श्यामा ॥ धृ. ॥

पद लाउनि विमलार्जुन कोणीं उद्धरिला ।

क्षणमात्रें दावनल कोणी प्राशियला ॥

बालपणी शकटासुर कोणीं नाशियला ।

बालक देउनि कोणीं गुरु संतोषविला ॥ जय देव ॥ २ ॥

वासुदेवासह जातां लावुनिया चरणां ।

कोणीं उथळ केली अवलीळा यमुना ॥

अवतारें अरुणानुज निजवाहन कोणा ।

मोहरिनादें कोणा लुब्ध व्रजललना ॥ जय देव ॥ ३ ॥

भोगनियां भोगातित कोणातें म्हणती ।

भारत भागवतवादी कोणाची ख्याती ॥

ऎसा तूं परमात्मा परब्रह्ममूर्ती ।

एकाजनार्दनह्र्दयीं ध्याता हे चित्ती ॥ जयदेव ॥ ४ ॥

मारुती आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
श्रीगोपालकृष्णाची आरती - जयदेव जयदेव वन्दे गोपालम्... श्रीकृष्ण आरती - अवतार गोकुळी हो । जन तारा... श्रीकृष्ण आरती - ओंवाळूं आरती मदनगोपाळा ॥ ... श्रीकृष्ण आरती - हरिनाम गोड झाले ॥ काय सा... श्रीकृष्ण आरती - येउन मानवदेहा भुललों संसा... श्रीकृष्ण आरती - कमलानन खगवाहन मणिभूण शौरी... श्रीकृष्ण आरती - श्रावणकृष्णाष्टमिसी गोकुळ... श्रीकृष्णाची आरती - वांकी चरणीं धरणी रांगसि य... श्रीकृष्णाची आरती - वृंदारकगुणवृंदं परमामृतकं... श्रीकृष्णाची आरती - निरसुनि देहत्रय अंतरमंदिर... श्रीकृष्णाची आरती - बंधु बलरामासह गोकुळीं अवत... श्रीकृष्णाची आरती - रजनी करकुल सुंदर देखुनि अ... श्रीकृष्णाची आरती - कोटि कुर्वंडिया माधवपायां... श्रीकृष्णाची आरती - हरि चला मंदिरा ऎशा म्हणती... श्रीकृष्णाची आरती - आरती भुवनसुंदराची । इंदि... श्रीकृष्णाची आरती - सुमनाचे शेजेवरी । पहुडली ... श्रीकृष्णाची आरती - परमानंदा परम पुरुषोत्तमा ... श्रीकृष्णाची आरती - दैत्यभारें पिडली पृथिवी ब... श्रीकृष्णाची आरती - कंसराये गर्भ वधियेले सात ... श्रीकृष्णाची आरती - जय बासूरिया तूंते कृपाळा ... श्रीकृष्णाची आरती - नंदयशोदाबाला कुटिलालकजाला... श्रीकृष्णाची आरती - कंसवधार्य धरातल धरिली भक्... श्रीकृष्णाची आरती - श्यामल वर्णा षड्रिपुदमना ... श्रीकृष्णाची आरती - जयजयजी कृष्णनाथ रुक्मिणीव... श्रीकृष्णाची आरती - प्रभुवर जय जय जय देव गीत ... श्रीकृष्णाची आरती - निर्गुण सगुणाकारं सह्रतभ ... श्रीकृष्णाची आरती - कुंददंत मंदहासय नंदनंदना ... श्रीकृष्णाची आरती - करुणाकर गुणसागर गिरिवर धर... श्रीकृष्णाची आरती - आरती कुंजबिहारीकी । गिरिध... श्रीकृष्णाची आरती - कोण शरण गेले विधि त्रिपुर... श्रीकृष्णाची आरती - आरती नंदलाला । व्रजवासी ग... श्रीकृष्णाची आरती - श्रीकृष्ण गोविंद गोपाळ रा...