Get it on Google Play
Download on the App Store

प्लॅन्चेट असे केले जाते

१. सर्वप्रथम सर्वलोकानी स्नान वगैरे करून यावे. मलमूत्र विसर्जन आधीच करून घावे कारण एकदा बसलो कि उठता येत नाही.
२. ज्या खोलीत बसायचे आहे तेथे पंखा इत्यादींचा आवाज असता कामा नये. वातावरण शांत असावे.
३. ज्या जागी बोर्ड ठेवलं ती जागा अतिशय स्वच्छ असावी आणि तिथे तुपाचा दिवा किंवा एखादी सात्विक वासाची अगरबत्ती लावावी.
४. मग तिन्ही लोकांनी बसून लोखंडी तुकड्यावर हळुवार बोट ठेवावे आणि शेवट पर्यंत काढू नये. काढल्यास त्याचे परिणाम वाईट होतात.
५. आता सर्वानी डोळे बंद करून एक प्रार्थना एक सुरांत म्हणावी. प्रार्थना नसल्यास ओम चा उच्चार तीन मिनिटे करावा.
६. आता डोळे उघडावे, जो लीडर आहे त्याने नम्रता पूर्वक आत्म्याचे आवाहन करावे आणि आपली इच्छा असल्यास लोखंडी तुकडा हलवून आपले अस्तित्व सिद्ध करावे अशी विनंती करावी. आवाजांत नम्रपणा अतिशय आवश्यक आहे.
७. बहुतेक वेळा काहीही होत नाही तेंव्हा आत्म्याला नम्र पाने सांगावे कि आपण आता जाऊ इच्छितो पण आत्म्याला राहायचे असेल तर त्याने तुकडा हलवावा. आत्म्याची अश्या प्रकारे परवानगी घेऊन नतंरच बोट काढावे.
८. काहीही नाही झाले तर जागा आणि वेळ बदलावी. सूर्यास्त हि नेहमीच चांगली वेळ असते. माणसे सुद्दा बदल्याने फरक पडतो कारण प्रत्येक व्यक्तीचा ऑरा वेगळा असतो.
९. प्रश्न अगदी साधे सोपे आणि नम्रपणे विचारावेत. खाजगी प्रश्न विचारत असताना आधी परवानगी घ्यावी.
१०. आधी सांगितल्या प्रमाणे परवानगी घेऊनच आणि धन्यवाद म्हणूनच निरोप घ्यावा, कधी कधी आत्मा अधिक वेळ राहू इच्छितो तेंव्हा त्याच्या इच्छेचा सन्मान करावा आणि जास्त वेळ राहावे.

प्लॅन्चेट प्रमाणे उज्जा बोर्ड सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे आणि तो प्लॅन्चेट प्रमाणेच कार्य करतो. पण ह्या प्रकारे आत्म्याची संवाद साधण्याचे संशोधन चिनी लोकांनी केले होते जिथे आजही डावो देवळांत स्पिरिट रायटिंग चालते. ते लोक रेशमी धाग्याला पेन बांधून संवाद साधतात.