Get it on Google Play
Download on the App Store

थरारक अनुभव: अकस्मात...!!

वसंत वडाळकर

फोन: +91-8329330190
vasant.malegaon@gmail.com

दि. ७ मे. १९८०.

आम्ही तिघेजण. दुपारची वेळ.

राजदूत गाडीवरून मालेगांव- चाळीसगांव मार्गावर प्रवास करत होतो.

गप्पा मारत हळू हळू जात होतो.

दरेगांव फाटा आला. तेथे आम्ही चहा-फराळ केला.

चार वाजले होते.

एकजण म्हणाला- "आता उतरते ऊन आहे. त्यापेक्षा आपण ५ वाजता निघू."

गप्पा मारत आम्ही वेळ काढत होतो. गिरणा डॅमवर मित्राच्या मित्राकडे जेवायला जायचे होते.

मालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता.

दरेगांव फाट्यावर आमचा बसण्याचा क्रम बदलला. मी मागे बसलो. माझा मित्र मध्ये बसला आणि मित्राचा मित्र गाडी चालवत होता....

***

साधारणत: ८-१० किलोमीटर आम्ही गेलो असू तोच माझ्या मित्राच्या अंगावर ३-४ फूट लांबीचा नाग पडला.

वर पाहतो तर घार घिरट्या घालत होती. तिच्या पायातून तो निसटून मित्राच्या अंगावर पडला व क्षणात मित्राच्या हाताचा चावा घेतला.

कारण साप चवताळलेला होता.

आम्ही गाडी थांबवली. गाडीखालीच सापाला मारले. तो नाग जहरी होता, विषारी होता.

***

आम्ही मित्राला घेवून परत मालेगांवला गेलो. मित्र पार घाबरून गेला होता. त्याला धीर देत देत आम्ही दवाखान्यात पोचलो.

आम्ही घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगितली.

नाग चावलेला हात दाखवला. त्यावर सूज आली होती.

मित्राची शुद्ध हरपत चालली होती.

"डॉक्टर, तुम्ही लवकर इलाज करा"

डॉक्टरांनी सलाईनमध्ये अ‍ॅण्टीव्हेनमलर टाकली.

सलाईनची अर्धी बाटली संपली असेल नसेल तोच मित्राला रक्ताची उलटी झाली.

आम्ही हतबल झालो. थोड्यावेळाने आचके देत मित्र देवाघरी गेला.

आमच्या दु:खाला पारावार राहिला नाही.

कित्येक दिवस मी सुन्न मनस्थितीत होतो....

***

मालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता.

नंतर आम्ही क्रम बदलला. मित्राचे मरण विधीलिखित होते म्हणून क्रम कदाचित बदलला गेला....

मध्ये मी असतो तर...???

आजही ते आठवून शहारे येतात.

अघटित घटना- वरून साप पडणे...

काळ कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही....

हा प्रसंग मला आजही तसाच आठवतो आणि जन्मभर आठवत राहील....

आरंभ: एप्रिल - मे २०१८

संपादक
Chapters
वर्ष १, अंक ४ संपादकीय सुट्टीचे नियोजन चला, हसूया!! उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जाण्यास आवडेल? बळूद आणि पेव हॅलोऽ मी मोनी बोलतेय...! देवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा! चांदण्या रात्रीत चंद्राच्या उजेडातील वाटचाल....! मी आहे सलोनी! गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी वृक्षवल्ली जीवन आमुचे...! रक्तदान जीवनदान..!! प्रिस्क्रिप्शन थरारक अनुभव: अकस्मात...!! माध्यमांतर सीरिज भाग ३ शालिमार अर्थक्षेत्र भाग ४ - डी मॅट अकाऊंट सिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे १ सिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे २ शेंगदाणे-मिरचीचा तव्यावरचा चवदार ठेचा! बडबडगीत : अंग घुसळे घुसळे....! बडबडगीत : अजून झोका पारंबीला......! बडबडगीत : खोपा.....! बडबडगीत : गावाकडचे हरीण...! बडबडगीत : जादूचे स्वप्न........! बडबडगीत : जादूच्या गोष्टी.....! चित्रकविता - पर्णहीन.. चित्रकविता - इवलासा जीव चित्रकविता - चिऊताई चित्रकविता - झपझप पडती.. चित्रकविता - जगन्नियंत्याच्या... परी गं परी पाढे गाती गाणे आजीची गोष्ट फुलपाखराचं गाणं....! उखाणे