Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

श्री.. ची..कविता:- ३

श्री ची कविता..३
------------------------------

तेजस्वी किरणें सुर्याची गं
शीतलता राही चंद्राची गं
मन प्रसन्न राहते यात गं 
येतो  जेव्हा तुझा भास गं

किरणाची शक्ती तुच गं
शीतलता ही तुझ्यात गं
जवळ असते तेव्हा  गं
होतो प्रेमसाक्षात्कार गं.

तुझ्या मोहात डुबलो गं
भान सारे विसरलो   गं 
तुझे रूप दिसे मज. गं
जिकडेतिकडे पाहता गं

मी तर भोळा प्रेमात गं
माझे प्रेमच भोळसर गं
तुझ्या या प्रेमासाठी गं 
जीव झुरतो  माझा गं 
==============
*श्रीधर कुलकर्णी*