Get it on Google Play
Download on the App Store

भारतीय संस्कृती 37

आज आपल्या समाजात धडे व मुंडकी दूर दूर पडलेली आहेत. धडाला मुंडके नाही व मुंडक्याला धड नाही! समाज-पुरुष असा मरून पडला आहे. बुद्धिजीवी लोक, डोकेबाज लोक श्रमजीवी माणसाची कदर करीत नाहीत. परंतु हे मुंडके धडाजवळ गेल्याशिवाय राष्ट्रात जिवंतपणा उत्पन्न होणार नाही. श्रमजीवी, बुद्धिजीवी एकत्र येऊ देत. बुद्धिवादी श्रम करू देत व श्रमणा-याला विचाराचा आनंद मिळू दे, असे होईल तो सुदिन.

भारतीय संस्कृती कर्ममय आहे. कर्माला प्राधान्य देणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला आळस खपत नाही. या संस्कृतीस कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही. कर्माचा महिमा भारतीय संस्कृतीत किती वाढविलेला आहे हे जरा पाहा तरी. ती ती कर्माची साधनेसुद्धा आपण पवित्र मानली आहेत. साधनेसुद्धा पवित्र, मग ते कर्म किती पवित्र असेल?

बायका केरसुणीला पाय लावू देत नाहीत, जात्याला पाय लावू देत नाहीत, चुलीला पाय लावू देत नाहीत, याचा अर्थ काय? बायकांची ही सेवासाधने आहेत. केर काढून, दळून, स्वयंपाक करून त्या सेवा करतात. त्या सेवेने त्या मुक्त होतात. त्यांच्या मोक्षप्राप्तीची साधने म्हणजे ती केरसुणी व ती चूल. केरसुणीला पाय लावणे म्हणजे पाप, ही गोष्ट ज्या संस्कृतीने शिकविली, त्या संस्कृतीच्या भक्तांनी व उपासकांनी केर काढण्याचे काम तुच्छ मानावे, झाडूवाल्याला पतित समजावे, हीन मानावे, ही केवढी खेदाची गोष्ट!

शेतकरी नांगराला पाय लावणार नाही. पंडित पुस्तकास पाय लावणार नाही. चांभार आपल्या दारावर कातड्याच्या तुकड्यांचे तोरण लावील. महार हाडे दारावर लावील. यात महान अर्थ आहे. ते ते सेवाकर्म पवित्र आहे. ब्राह्मण समाजाची सेवा ज्ञानदानाने करीत असेल, तर सेवासाधन जे पुस्तक ते तो स्वत: पवित्र मानील; आणि इतरही त्याचे ते सेवासाधन तुच्छ मानणार नाहीत. महार-चांभार मृत ढोरे फाडून समाजाची सेवा करीत असतील, तर ती हाडे, ती चर्मे पवित्र आहेत. त्यातून ते संपत्ती निर्माण करीत आहेत. स्मशानात शिव राहतो व त्याच्या गळ्यात हाडांचे अलंकार आहेत. महार-चांभार म्हणजेच शिवशंकराची मूर्ती होय.

महाभारतात अर्जुनाला गांडीव धनुष्याची निंदा सहन होत नसे, अशी गोष्ट आहे. गांडीवाची निंदा करणा-या धर्मराजासही मारावयास तो धावला. अर्जुनाला गांडीव इतके प्रिय व पवित्र का वाटे? कारण ते त्याचे सेवासाधन होते. समाजाचे दुष्टांपासून संरक्षण करण्याचे, दीनदुबळ्यांचे संरक्षण करण्याचे ते धनुष्य साधन होते त्याची निंदा अर्जुनाला सहन होणार नाही.

ती ती सेवासाधनेही पवित्र आहेत. मग ती कर्मे पवित्र नाहीत का? लेखणी असो वा तलवार असो, तराजू असो वा नांगर असो, चूल असो किंवा झाडू असो, आरी असो की वस्तरा असो, ही सारी सेवासाधने भारतीय संस्कृती पवित्र मानील.

सेवेच्या साधनांची कितीतरी काळजी घेण्याबद्दल सांगितले आहे. सेवासाधने सदैव स्वच्छ ठेवावीत, नाहीतर सेवा उत्कृष्ट करता येणार नाही. पंडिताजवळची पुस्तके नीट व्यवस्थित असावीत. वीराजवळ शस्त्रे घासून-पुसून ठेवलेली असावीत. चूल सारवलेली असावी. कोयता, विळा धार लावलेले असावेत. सेवेची साधने नीट न ठेवली तर उत्कृष्ट सेवा करता येणार नाही.

परंतु येथे एक गोष्ट सांगाविशी वाटते. मनुष्य सेवासाधन काळजीपूर्वक वापरतो, परंतु क्ही साधनांकडे तो दुर्लक्ष करतो. सेवासाधने दोन प्रकारची आहेत: सजीव व निर्जीव.

भारतीय संस्कृती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
भारतीय संस्कृती 1 भारतीय संस्कृती 2 भारतीय संस्कृती 3 भारतीय संस्कृती 4 भारतीय संस्कृती 5 भारतीय संस्कृती 6 भारतीय संस्कृती 7 भारतीय संस्कृती 8 भारतीय संस्कृती 9 भारतीय संस्कृती 10 भारतीय संस्कृती 11 भारतीय संस्कृती 12 भारतीय संस्कृती 13 भारतीय संस्कृती 14 भारतीय संस्कृती 15 भारतीय संस्कृती 16 भारतीय संस्कृती 17 भारतीय संस्कृती 18 भारतीय संस्कृती 19 भारतीय संस्कृती 20 भारतीय संस्कृती 21 भारतीय संस्कृती 22 भारतीय संस्कृती 23 भारतीय संस्कृती 24 भारतीय संस्कृती 25 भारतीय संस्कृती 26 भारतीय संस्कृती 27 भारतीय संस्कृती 28 भारतीय संस्कृती 29 भारतीय संस्कृती 30 भारतीय संस्कृती 31 भारतीय संस्कृती 32 भारतीय संस्कृती 33 भारतीय संस्कृती 34 भारतीय संस्कृती 35 भारतीय संस्कृती 36 भारतीय संस्कृती 37 भारतीय संस्कृती 38 भारतीय संस्कृती 39 भारतीय संस्कृती 40 भारतीय संस्कृती 41 भारतीय संस्कृती 42 भारतीय संस्कृती 43 भारतीय संस्कृती 44 भारतीय संस्कृती 45 भारतीय संस्कृती 46 भारतीय संस्कृती 47 भारतीय संस्कृती 48 भारतीय संस्कृती 49 भारतीय संस्कृती 50 भारतीय संस्कृती 51 भारतीय संस्कृती 52 भारतीय संस्कृती 53 भारतीय संस्कृती 54 भारतीय संस्कृती 55 भारतीय संस्कृती 56 भारतीय संस्कृती 57 भारतीय संस्कृती 58 भारतीय संस्कृती 59 भारतीय संस्कृती 60 भारतीय संस्कृती 61 भारतीय संस्कृती 62 भारतीय संस्कृती 63 भारतीय संस्कृती 64 भारतीय संस्कृती 65 भारतीय संस्कृती 66 भारतीय संस्कृती 67 भारतीय संस्कृती 68 भारतीय संस्कृती 69 भारतीय संस्कृती 70 भारतीय संस्कृती 71 भारतीय संस्कृती 72 भारतीय संस्कृती 73 भारतीय संस्कृती 74 भारतीय संस्कृती 75 भारतीय संस्कृती 76 भारतीय संस्कृती 77 भारतीय संस्कृती 78 भारतीय संस्कृती 79 भारतीय संस्कृती 80 भारतीय संस्कृती 81 भारतीय संस्कृती 82 भारतीय संस्कृती 83 भारतीय संस्कृती 84 भारतीय संस्कृती 85 भारतीय संस्कृती 86 भारतीय संस्कृती 87 भारतीय संस्कृती 88 भारतीय संस्कृती 89 भारतीय संस्कृती 90 भारतीय संस्कृती 91 भारतीय संस्कृती 92 भारतीय संस्कृती 93 भारतीय संस्कृती 94 भारतीय संस्कृती 95 भारतीय संस्कृती 96 भारतीय संस्कृती 97 भारतीय संस्कृती 98 भारतीय संस्कृती 99 भारतीय संस्कृती 100 भारतीय संस्कृती 101 भारतीय संस्कृती 102 भारतीय संस्कृती 103 भारतीय संस्कृती 104 भारतीय संस्कृती 105 भारतीय संस्कृती 106 भारतीय संस्कृती 107 भारतीय संस्कृती 108 भारतीय संस्कृती 109 भारतीय संस्कृती 110 भारतीय संस्कृती 111 भारतीय संस्कृती 112 भारतीय संस्कृती 113 भारतीय संस्कृती 114 भारतीय संस्कृती 115 भारतीय संस्कृती 116 भारतीय संस्कृती 117 भारतीय संस्कृती 118 भारतीय संस्कृती 119 भारतीय संस्कृती 120 भारतीय संस्कृती 121 भारतीय संस्कृती 122 भारतीय संस्कृती 123 भारतीय संस्कृती 124 भारतीय संस्कृती 125 भारतीय संस्कृती 126 भारतीय संस्कृती 127 भारतीय संस्कृती 128 भारतीय संस्कृती 129 भारतीय संस्कृती 130 भारतीय संस्कृती 131 भारतीय संस्कृती 132 भारतीय संस्कृती 133 भारतीय संस्कृती 134 भारतीय संस्कृती 135 भारतीय संस्कृती 136 भारतीय संस्कृती 137 भारतीय संस्कृती 138 भारतीय संस्कृती 139 भारतीय संस्कृती 140 भारतीय संस्कृती 141 भारतीय संस्कृती 142 भारतीय संस्कृती 143 भारतीय संस्कृती 144 भारतीय संस्कृती 145 भारतीय संस्कृती 146 भारतीय संस्कृती 147 भारतीय संस्कृती 148 भारतीय संस्कृती 149 भारतीय संस्कृती 150 भारतीय संस्कृती 151 भारतीय संस्कृती 152 भारतीय संस्कृती 153 भारतीय संस्कृती 154 भारतीय संस्कृती 155 भारतीय संस्कृती 156 भारतीय संस्कृती 157 भारतीय संस्कृती 158 भारतीय संस्कृती 159 भारतीय संस्कृती 160 मातृभोजन गीत भारतीय संस्कृती 162 भारतीय संस्कृती 163 भारतीय संस्कृती 164 भारतीय संस्कृती 165 भारतीय संस्कृती 166 भारतीय संस्कृती 167 भारतीय संस्कृती 168 भारतीय संस्कृती 169 भारतीय संस्कृती 170 भारतीय संस्कृती 171 भारतीय संस्कृती 172 भारतीय संस्कृती 173 भारतीय संस्कृती 174 भारतीय संस्कृती 175 भारतीय संस्कृती 176 भारतीय संस्कृती 177 भारतीय संस्कृती 178 भारतीय संस्कृती 179 भारतीय संस्कृती 180 भारतीय संस्कृती 181 भारतीय संस्कृती 182 वाघ मानव परस्पर सबंधं निबंध