Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

कर्नल सायटो 'ब्रिटिश प्रिझनर्स' असे संबोधत त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करतो. 'आपले अधिकारी हमाली काम करणार नाहीत,' या कायद्याच्या भूमिकेवर निकोल्सन ताठ. सर्व ब्रिटिश सैनिक कामाला जातात; पण अधिकारी मात्र तसेच असहकार पुकारून उभे! कर्नल निकोल्सनही! सूर्य चढतोय! त्यांच्यावर सायटोच्या सैनिकांच्या बंदुका रोखलेल्या! रुग्णालयातील डॉक्टर क्लिप्टन आणि सर्व रुग्ण हे दृश्य पाहताहेत. कर्नल सायटो जरी अरेरावी करत असला तरी इतका निर्ढावलेला नाही! संध्याकाळ होते. युद्धकैदी परततात. मुद्दाम त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व अधिकार्यांना Punishment Hut मध्ये डांबण्यात येते; तर निकोल्सनला एका पत्र्याच्या बंद झोपडीत! पण सैनिकांचे मनोधैर्य खचत नाही. सामूहिकपणे ते आपल्या नेत्यच

आता खरे धर्मयुद्ध सुरु-'सुसंस्क्रुत जगाचे युद्धाचे नियम, कायदे तुम्ही पाळत नसाल तर तुमची आज्ञा माझे अधिकारी पाळणार नाहीत'-निकोल्सन्ची ठाम भूमिका. एक शिस्त त्याच्या रक्तात भिनलेली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या सैनिकांनी भेकडपणे पळून जाऊ नये. येथे कायदा नसेल तर आपण तो आणू. पराभूत असलो तरी सैनिक म्हणून मानाने काम करू.' हे त्याचे सांगणे.

इकडे अमेरिकन कमांडर शिअर्स, लेफ्टनंट जिनिग्ज व दोन कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यात शिअर्स सोडून सर्व मारले जातात. शिअर्स पळताना उंचावरून खाली वाहत्या नदीत पडतो. तो बुडून मेला, अशी सैनिकांची समजूत; पण त्याचं नशीब – नव्हे दुर्दम्य इच्छाशक्ती किंवा जीवनेच्छा प्रबळ म्हणा – म्हणून एका सुंदर बेटाला तो लागतो व तेथील आदिवासी त्याला मदत करतात. पुरेसे खायला – प्यायला व एक होडकं देऊन प्रेमाने पाठवणी करतात.

त्याबाजूने निकोल्सनच्या सैनिकांनी असहकार पुकारलेला. काम तर ते करतात; पण अगदी मंदगतीने, मुका निषेध दाखवीत. कर्नल सायटोवर वरिष्ठांकडून पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दबाव आहे, त्यातच चालू काम पुनःपुन्हा कोसळते आहे. त्याची सर्व बाजूंनी कोंडी झालेली. तोही कर्नल निकोल्सनवर वेगवेगळ्या प्रकारे मानसिक दबाव आणू पाहतो आहे.

डॉ. क्लिप्टनला निकोल्सनच्या भेटीला पाठविले जाते, तेही कर्नल सायटोची पूर्वपरवानगी घेऊनच! त्याच्या सहकार्‍यांनी त्याच्यासाठी छोट्या भेटि दिलेल्या. पाण्याने भरलेला नारळ, काही खाद्दपदार्थ चोरून, राखून ठेवलेले. बंद पेटिचे दार उघडले जाते. क्षणभर उजेडाने निकोल्सन्चे डोळे दिपतात. ल्किप्टन त्याला सांगतो की, जर अधिकार्‍यांनी कान केले नाही तर रुग्ण कैद्दांना कामाला जुंपले जाईल अन् त्यांचं काही बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी निकोल्सनवर राहील.