Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

बालपण


कधी न दमलो

सदैव रमलो 

भूतकाळात...

बालपणीच्या गोड आठवणी

अन सळसळते तारुण्य

आठवताना आज मी

होतो रममाण...

दिवस शाळेचे

तेव्हा वाटे त्रासाचे

ओझे अभ्यासाचे आणि

टेन्शन गुरुजींच्या माराचे...

शाळा संपली,

सुटलो वाटे जाता कॉलेजात

सदैव बंक वा टीवल्याबवल्या

सरले की हो दिवस यात...

आली परीक्षा,

विचाराने या फाटली हात हात

लपवा चिठ्या करा कॉप्या

झालो एकदाचा पास...

झालो पास

आता नोकरीसाठी वणवण

खाल्या खस्ता भेटली नोकरी

परी ना पदरी सुखाचे क्षण...

लग्न ठरले

लग्न झाले

आता संसाराचा व्याप

कुठून पडलो भानगडीत

फुकटचा डोक्याला ताप...

पुन्हा एकदा

वाटे मजला जावे बालपणात

ना चिंता ना ओझे कशाचे

दिवस तेच वाटती छान...

हरवले आज

ते सोनेरी दिवस

मित्रांची संगत

अन रुपयाची गारेगार

आवळे चिंचा कैऱ्या

खेळाची धमाल...

लहानपणी वाटे

सुख असे मोठे होण्यात

पण देवा खरंच एकदा तरी 

नेशील का रे पुन्हा बालपणात...

दूर कुठेतरी हृदयात

आहे अजून लपलेला

अवखळ खोडकरपणा

आणि शिक्षकांना दिलेला त्रास...

जगायचंय पुन्हा

अनुभवायचंय बालपण

ते शाळेचे दिवस

तो अभ्यास आणि मार...

देवा एकदा तरी

नेशील का रे बालपणात

नेशील का रे बालपणात...