Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

चढणं म्हणजे काय असते रे भाऊ

चढणं म्हणजे काय असते रे भौ ?

लेका, चढणं म्हणजे विचारांशी लढण असते रे भौ

विचारांशी लढणं म्हणजे काय असत रे भौ ?

लेका , विचारांशी लढणं म्हणजे नजरेतून पडणं असते रे भौ

नजरेतून पडणं म्हणजे काय रे भौ ?

लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ ?

लेका मनाविरुद्ध उडणं म्हणजेच लढत लढता पडणं असते रे भौ

लढता लढता पडणं , म्हणजे काय असते रे भौ ?

आरं लेका, तेच तर तुला सांगतोय

मनाविरुद्ध उडणं म्हणजे दुसरीकडे चढणं असते रे भौ

सिद्धेश्वर विलास पाटणकर