Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

उसने हसून काय मिळविले ?

उसने हसून काय मिळविले ?

तिला वाटलो निर्लज्ज मी

प्रेमात आकंठ बुडालो असूनही

तिच्यापासून दुरावलो मी

तिच्या अश्रूंमध्ये मी उद्याचा पाऊस पाहिला

रुमाल दिला कि नाही ते आठवत नाही मला

पण तिचा रडवेला चेहरा मात्र हसून पाहिला

तिच्या दुःखावर नव्हे, नाही तिच्या भावनांवर

माझा खांदा तिच्या लायक आहे कि नाही

तो मी तपासून पाहिला

अंतःकरणात आलेल्या चैतन्यमयी उकळीचे

लगेच निवारण झाले

हसण्याचे कारण असे काही झोंबले

उभा होतो तिथेच तिने मित्राचे खांदे पकडले

मी आणि माझ्या प्रेमाचे हसरे कोंब

दोघांचेही पुरते वांदे झाले

सिद्धेश्वर विलास पाटणकर